वर्धा जिल्ह्यात श्वानांच्या हल्ल्यात पाडस ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 15:42 IST2020-06-12T15:42:16+5:302020-06-12T15:42:39+5:30
कारंजा शहरातील गोकुळसिटी कॉलनीत हरणाचे पाडस भटकले. त्याच्यावर पाच ते सहा श्वानांनी पाठलाग करून हल्ला चढविला.

वर्धा जिल्ह्यात श्वानांच्या हल्ल्यात पाडस ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पाण्याच्या शोधात गावाकडे भटकलेल्या हरिणाच्या पाडसावर श्वानांनी हल्ला चढवून जखमी केले. त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले असता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. कारंजा (घाडगे) येथील गोकुळसिटी कॉलनीत ही घटना घडली.
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र शुकशुकाट असल्याने जंगलातील प्राणी गावाच्या दिशेने धाव घेत आहेत. अशातच बुधवारी कारंजा शहरातील गोकुळसिटी कॉलनीत हरणाचे पाडस भटकले. त्याच्यावर पाच ते सहा श्वानांनी पाठलाग करून हल्ला चढविला. नागरिकांनी लागलीच धाव घेऊन पाडसाची श्वानांच्या तावडीतून सुटका केली पण, ते गंभीर जखमी झाले होते. पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने मृतदेह ताब्यात घेऊन जंगलात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.