‘रेस्क्यू’केलेल्या बिबट्याचा मृत्यू, संशयाचे वलय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 11:05 AM2023-07-21T11:05:38+5:302023-07-21T11:06:54+5:30

शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष

death of 'rescued' leopard, rings of suspicion | ‘रेस्क्यू’केलेल्या बिबट्याचा मृत्यू, संशयाचे वलय

‘रेस्क्यू’केलेल्या बिबट्याचा मृत्यू, संशयाचे वलय

googlenewsNext

वर्धा : हिंदी विद्यापीठ परिसरातून रेस्क्यू करण्यात आलेल्या बिबट्याचा बुधवारी १९ रोजी रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. २० रोजी शवविच्छेदन झाल्यावर बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बिबट्याचा मृत्यू काविळने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असला तरी शवविच्छेदन अहवाल आल्यावरच नेमका मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट होईल. बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या बिबट्याचे रेस्क्यू करण्यात आले होते. मात्र, बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डॉट मारण्याला परवानगी होती काय, डॉटमधील औषध योग्य मात्रेत होते काय, त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू होती काय, असे एक ना अनेक प्रश्न वन्यप्रेमींकडून उपस्थित केले जात आहे

बेशुद्ध बिबट्याला पिपल फॉर ॲनिमलच्या करुणाश्रमात नेण्यात आले होते. कुणालाही आतमध्ये प्रवेश नव्हता. त्यामुळे बिबट्याच्या मृत्यूनंतर आता वन्यजीव प्रेमींमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. बिबट्यावरील अंत्यसंस्काराच्यावेळी मानद वन्यजीव संरक्षक कौशलप्रसाद मिश्र, संजय इंगळे तिगावर उपस्थित होते.

रात्रीच्या सुमारास बिबट्याचा मृत्यू झाला. जेव्हा डॉट मारले तेव्हा तेथे डॉक्टर उपस्थित नव्हते. तसेच पिपल फॉर ॲनिमलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर होते की नाही याची मला माहिती नाही. वन विभागाचे कुणीही तेथे उपस्थित नव्हते. तीन डॉक्टरांच्या चमूने शवविच्छेदन केले असून काविळने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

रुपेश खेडीकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग.

बिबट्याचे रक्त नमुणे नागपूर येथील गोरेवाडा येथे पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल अद्याप माझ्याकडे आलेला नाही. डॉट मारण्याची परवानगी केंद्रातून मिळते. ज्याने डॉट मारला त्याच्याजवळही परवानगी असु शकते. डॉट मारताना वापरण्यात आलेल्या औषधीची मात्रा कमी किंवा जास्त होती हे शवविच्छेदन अहवाल आल्यावरच माहिती पडेल.

राकेश शेपट, उपवन संरक्षक अधिकारी. वनविभाग.

केंद्र सरकारच्या रेस्क्यू सेंटरकडून डॉट गन चालविण्याचा परवाना कौस्तुभ गावंडे याला मिळाला आहे. बेहोश करण्यासाठी वापरण्यात आलेले औषधही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच दिले जाते. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये एका खासगी डॉक्टरसह २० जणांची टीम होती.

आशिष गोस्वामी, संचालक, पिपल फॉर अॅनिमल.

Web Title: death of 'rescued' leopard, rings of suspicion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.