सिंदी मेघे परिसरात आढळले स्त्री जातींचे मृत अर्भक; अज्ञात महिलेविरोधात गुन्हा
By चैतन्य जोशी | Updated: August 27, 2022 16:36 IST2022-08-27T16:36:29+5:302022-08-27T16:36:54+5:30
अर्भक मिळाल्याने खळबळ, सिंदी मेघेच्या बहुजन नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या विजय उमरे यांच्या घराशेजारी असलेल्या रिकाम्या भूखंडातील कचऱ्यात हा अर्भक सकाळी नजरेस पडला.

सिंदी मेघे परिसरात आढळले स्त्री जातींचे मृत अर्भक; अज्ञात महिलेविरोधात गुन्हा
चैतन्य जोशी
वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या सिंदी मेघे परिसरातील बहुजन नगर येथे कचऱ्यात स्त्री जातीने मृत अर्भक आढळल्याने खळबळ माजली. हा मृत अर्भक सहा ते सात महिन्याचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.या प्रकरणी रामनगर पोलिसांनी घटनास्थळी जातं अर्भकाला ताब्यात घेत अज्ञात महिलेविरुद्ध विविध कलमन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सिंदी मेघेच्या बहुजन नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या विजय उमरे यांच्या घराशेजारी असलेल्या रिकाम्या भूखंडातील कचऱ्यात हा अर्भक सकाळी नजरेस पडला. कचऱ्यात अर्भक दिसताच परिसरातील नागरिकांनी याची माहिती रामनगर पोलिसांना दिली. कोणीतरी अज्ञात स्त्री ने स्वतःच्या पोटातील गर्भाचा गर्भपात करून जन्मलेल्या स्त्री जातीच्या मृत अर्भकाची स्वतः किंवा इतर दुसऱ्याच्या मदतीने अर्भकास कचऱ्यात फेकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे.या प्रकरणी रामनगर पोलिसांनी विविध कलमनव्ये अज्ञात स्त्री विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी अर्भकाला ताब्यात घेत वर्धेच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.
शासनाकडून स्त्री भ्रूणहत्या थांबवावी याकरिता वेगवेगळ्या योजना आणल्या जातं असून त्याबाबत मोठा प्रचार व प्रसार सुद्धा केला जातं आहे. मात्र एवढं करूनही नागरिकांच्या मानसिकतेत कोणताही बदल होताना दिसत नाही. हा अर्भक कोणाचा असून कोणी फेकला याबाबत रामनगर पोलीस तपास करत आहे.