दिवसानुरूप लग्नाचे स्वरूप बदलले
By Admin | Updated: May 18, 2014 23:50 IST2014-05-18T23:50:17+5:302014-05-18T23:50:17+5:30
सध्या लग्नसराईला चांगलाच जोर आलाय; परंतु दिवसागणिक लग्नाचा ‘लूक’ पूर्वीपेक्षा बदलत चाललाय. प्रत्येक बाबतीत कमालिची भिन्नता दिसून येते.

दिवसानुरूप लग्नाचे स्वरूप बदलले
ंवर्धा : सध्या लग्नसराईला चांगलाच जोर आलाय; परंतु दिवसागणिक लग्नाचा ‘लूक’ पूर्वीपेक्षा बदलत चाललाय. प्रत्येक बाबतीत कमालिची भिन्नता दिसून येते. लग्न सोहळा म्हटला की मित्र, नातलग व गावकर्यांना संदेश पोहोचविण्यासाठी लग्नपत्रिका बहूतेक टपालाद्वारेच पाठवित होते. परंतु आज एका पत्रिकेला पाच-दहा रुपयांचे टिकीट लावावे लागत असल्याने केवळ लांब पल्ल्याच्या पत्रिकाच टपालाद्वारे पाठविल्या जाते. किंवा स्वत: दुचकीद्वारे, लग्नमंडपात भेटीत दिल्या जात आहे. लग्नाचे बंधन जोडले की, साखरपुडा लग्नासारखा साजरा करीत आहे. त्यातूनही अनिवार्य खर्च होताना दिसतो. लग्नसराईला जुने महत्त्व अजूनही शिल्लक आहे. यात लग्नाच्या आदल्या दिवशी नांदमुखाचा कार्यक्रम, देवकुंडी, लग्नमंडप टाकण्याची प्रथा अद्याप आहे. परंतु सध्यातरी बॅडबाजा हा कमी प्रमाणात दिसतोय. तरुणाई डीजेच्या तालावर नाचत असल्याचे चित्र आहे. पूर्वी बँडवाल्यास दोन दिवसासाठी सांगितले जायचे. गावात मिरवणूक काढून दुसर्या दिवशी नववधू घरी येईपर्यंत हा बँडबाजा दिसायचा. आता गावात मिरवणूकीसाठी डीजे अन् लग्नाच्या ठिकाणावर बँडबाजा दिसून येतो. विशेष बाब म्हणजे हूंडा नको ग बाई, अशी म्हणणारी वराकडील मंडळी चुप्पी साधत गुप्तपणे हूंडा घेत आहे. आज लग्नात पगंतीऐवजी बुफे पद्धत असून वर-वधू पक्षातील मंडळीकडून अन्नाची नासाडी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)