बसच्या धडकेत सायकलस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 06:00 AM2019-11-05T06:00:00+5:302019-11-05T06:00:11+5:30
प्राप्त माहितीनुसार, एम.एच. ४० वाय. ५३०९ क्रमांकाची बस आर्वीकडून वर्धेच्या दिशेने येत होती. सदर भरधाव बस पिंपळखुटा बस स्थानकाच्या जवळ आली असता सायकलने लाकडाची मोळी घेऊन जाणाऱ्या गणेशला बसने जबर धडक दिली. यात गणेश हा गंभीर जखमी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खरांगणा (मो.) : स्वयंपाकासाठी सायकलच्या सहाय्याने लाकडाची मोळी घेऊन जाणाऱ्यास राज्य परिवहन महामंडळाच्या बसने जबर धडक दिली. यात सायकल चालक गणेश भाऊराव रंगारी (५०) रा. पिंपळखुटा याचा मृत्यू झाला. अपघात होतच वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहन अगदी नाल्याच्या काठावर जाऊन थांबल्याने बस मधील प्रवासी थोडक्यात बचावले. ही घटना नजीकच्या पिंपळखुटा येथे सोमवारी सकाळी घडली.
प्राप्त माहितीनुसार, एम.एच. ४० वाय. ५३०९ क्रमांकाची बस आर्वीकडून वर्धेच्या दिशेने येत होती. सदर भरधाव बस पिंपळखुटा बस स्थानकाच्या जवळ आली असता सायकलने लाकडाची मोळी घेऊन जाणाऱ्या गणेशला बसने जबर धडक दिली. यात गणेश हा गंभीर जखमी झाला.
अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमीला तातडीने रुग्णालयाकडे रवाना केले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती गणेशला मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच खरांगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.