शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

सायबर ठाण्याच्या कार्याची घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 23:55 IST

दिवसेंदिवस वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यात ४० सायबर लॅब स्थापन केल्या आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धेतही सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमुंबई दरबारी झाला गौरव : बनावट कॉल सेंटरचा तपास उल्लेखनीय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवसेंदिवस वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यात ४० सायबर लॅब स्थापन केल्या आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धेतही सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. याच सायबर पोलीस ठाण्याच्यावतीने रामनगर व सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा छडा लावत बनावटी कॉल सेंटर उघडकीस आणण्याच्या उल्लेखनिय कार्याची मुंबई दरबारी दखल घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात वर्धा सायबर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर) ब्रिजेश सिंग यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.१५ आॅगस्ट २०१६ ला स्थापन करण्यात आलेल्या सायबर लॅबला त्यानंतर पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात आला. वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालणे, जनतेमध्ये सायबर गुन्ह्यांसंबधाने जनजागृती करणे, दाखल गुन्ह्यांचा बारकाईने तपास करून सायबर गुन्ह्यांचे प्रकटीकरण करणे हा या पोलीस ठाण्याचा उद्देश आहे. वर्धा सायबर पोलीस ठाण्यातर्फे क्रेडीट कार्ड फ्रॉड, मोबाईल टॉवरच्या नावाखाली झालेली फसवणूक, भाग्यवान विजेते सांगून केले जाणारे गुन्हे, बँक खात्यातून परस्पर उडविली जाणारी रक्कम, अशी विविध गुन्हे उघडकीस आणली आहे. याच कार्याची दखल पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन वर्धेच्या पोलीस कर्मचाºयांना गौरविले आहे.मागील तीन वर्षांमध्ये राज्यातील सायबर पो.स्टे. ने केलेल्या उल्लेखनिय कामगीरी, गुन्हे प्रकटीकरण, जनजागृती, राबवीलेले अभीनव उपक्रम या बाबत लेखाजोखा सादर करण्याच्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर यांनी ४ मे रोजी मुंबई येथे विशेष बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीत वर्धा सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. त्यांच्या रामनगर व सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या प्रकटीकरणातील मदतीची यावेळी वरिष्ठांकडून दखल घेण्यात आली. शिवाय विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर) ब्रिजेश सिंग यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम