शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

टाईल्स विके्रत्याला ग्राहक न्यायालयाचा दणका

By admin | Updated: July 27, 2014 23:54 IST

घराकरिता टाईल्स खरेदी करताना ग्राहकाकडून एमआरपीपेक्षा जास्त किंमत वसूल करणाऱ्या विके्रत्यास ग्राहक न्यायालयाने प्राप्त तक्रारीवरून आर्थिक दंड ठोठावला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास

वर्धा : घराकरिता टाईल्स खरेदी करताना ग्राहकाकडून एमआरपीपेक्षा जास्त किंमत वसूल करणाऱ्या विके्रत्यास ग्राहक न्यायालयाने प्राप्त तक्रारीवरून आर्थिक दंड ठोठावला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास विके्रत्याकडून टाळाटाळ करण्यात आल्यास दंडाची रक्कम व्याजदराने देण्याचे आदेशात नमुद आहे. शारीरिक व मानसिक त्रासापोटी तक्रारीकरिता आलेल्या खर्चाची रक्कम परत करण्याचाही आदेश विक्रेत्यास दिला आहे. गणेश लाडेकर यांच्या तक्रारीवरून विक्रेता पंकज नरेडी यांच्या विरुद्ध हा आदेश पारित केला आहे.माहितीनुसार, देवळी येथील गणेश लाडेकर यांनी शक्ती टाईल्स, कारला रोड, वर्धा येथून टाईल्सची खरेदी केली होती. यावेळी टाईल्सच्या पेटीवर दिलेल्या छापील एमआरपीपेक्षा विक्रेत्याने १४ हजार ४९७ रुपये अधिक घेतल्याचे लाडेकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी खरेदी केलेल्या विविध पेट्यापैकी एमआरपीपेक्षा सहा हजार, ९ हजार ७६० आणि १ हजार ९१७ अशा तीन वेगवेगळ्या आकारातील टाईल्स पेटीवर पैसे अधिक घेतले. यानंतर लाडेकर यांनी दुकानात जावून याबाबत तक्रार केली असता. विक्रेत्याने जादा पैसे आकारण्याची बाब स्पष्टपणे नाकारली. आपल्या विनंतीस विक्रेत्याकडून धुडकावून देण्यात येत असल्याचा प्रकार लक्षात येताच त्यांनी न्यायाकरिता ग्राहक तक्रार निवारण मंच येथे विक्रेत्याविरुद्ध तक्रार दाखल केली.तक्रारीनंतर ग्राहक न्यायालयाने गैरअर्जदार पंकज नरेडी यांना न्यायालयात सुनावणीस उपस्थित राहण्याचे पत्र पाठविले. मात्र त्यांनी ही तक्रार स्वीकारली नाही. म्हणून ‘नो क्लेम’ या पोस्टाच्या शेऱ्यासह नोटीस परत आली. यानंतर पाठविलेल्या नोटीसलाही गैरअर्जदाराने कोणताच प्रतिसाद दिला नाही. अखेर ग्राहक न्यायालयाने हे प्रकरण एकतर्फी चालविण्याचा निर्णय घेत तसा आदेश पारित केला. यावर सुनावणी करून लाडेकर यांना न्याय देवून दिलासा दिला आहे.यावेळी मंचाचे प्रभारी अध्यक्ष मिलिंद केदार, सदस्य स्मिता चांदेकर यांनी न्यायदान प्रक्रिया पार पाडली.(स्थानिक प्रतिनिधी)