शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीचे बळी; विदर्भात आणखी तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2022 17:07 IST

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने त्यांच्या संकटात आणखीच भर घातली.

आर्वी (वर्धा)/ गोंदिया/ भंडारा : अतिवृष्टीमुळे स्वप्नांवर पाणी फेरल्याने हताश झालेल्या तीन शेतकऱ्यांनी आपले जीनव संपवले. आर्वी तालुक्याती उमरी (सुकळी) येथील शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून शेतातच विष प्राशन केले. त्यांना तातडीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

लोकराज मारोतराव कालोकार (४५, रा. उमरी (सुकळी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे सहा एकर शेती असून यावर्षी अतिवृष्टीने सर्व पीक खरडून गेल्याने त्यांची शेती पडीक राहिली. तीन वर्षांपासून त्यांच्याकडे मोरांगणा शाखेच्या बँक ऑफ इंडिया शाखेचे दीड लाख रुपयांचे कर्ज होते. आता बँकेचे कर्ज वसुलीकरिता तगादा लावला होता तसेच यावर्षी शेती पडीक राहिल्याने उत्पन्नाची काहीच अपेक्षा नसल्याने ते आर्थिक विवंचनेत सापडले होते. त्यामुळे लोकराज हे सतत चिंतेत असायचे. यातूनच त्यांनी २८ ऑक्टोबरला पुतण्याच्या शेतात जावून विष प्राशन केले.

ही बाब पुतण्या व कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरु असताना ३० ऑक्टोबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने या परिवारावर मोठे संकट ओढावले आहे.

गोंदिया जिल्ह्यात विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

आमगाव तालुक्यातील ग्राम जवरी येथील शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता दरम्यान घडली. मदन बकाराम गायधने (४८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मदन गायधने यांनी अनेकांकडून उसने पैसे घेतले होते. त्यात यंदा पावसाने धुमाकूळ घातला. आता माव्याने कहर केल्याने ते चिंताग्रस्त होते. यातच त्यांनी सतत होत असलेली नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन केले. विष प्राशन केल्यानंतर ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच घरच्यांनी त्यांना आमगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

भंडाऱ्यात शेतकऱ्याने पीक नुकसानीला कंटाळून संपवले जीवन

खरिपात लागवडीखालील धान पीक पुराच्या पाण्याने नष्ट झाल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना लाखांदूर तालुक्यातील चिचोली येथील नर्सरी परिसरात सोमवारी सकाळी ५ च्या सुमारास उघडकीस आली. सीताराम महादेव शेंडे (६५, रा. भागडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सीताराम शेंडे यांचे भागडी ते मांढळ मार्गावरील नाल्यानजीक जवळपास दीड एकर शेतजमीन आहे. खरीप हंगामात धान पिकाची लागवड केली होती. मात्र, मुसळधार पावसासह तब्बल तीनदा चुलबंद नदीसह नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली होती. शेती नाल्याच्या बाजूला असल्याने पुराचे पाणी शेतात शिरल्याने पीक नष्ट झाले. लागवडीखालील पिकांवर हजारो रुपये खर्च करून देखील पुराच्या पाण्याने पीक नष्ट झाल्याने शेंडे हे विवंचनेत होते. घटनेच्या दिवशी घरात कुणालाही न सांगता ते निघून गेले. चिचोली येथील नर्सरीतील एका झाडाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूVidarbhaविदर्भ