पावसामुळे दुबार पेरण्या संकटात
By Admin | Updated: July 23, 2014 23:45 IST2014-07-23T23:45:29+5:302014-07-23T23:45:29+5:30
अपुऱ्या पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या पूर्ववत होताच पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी, दुबार पेरण्या संकटात सापडल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

पावसामुळे दुबार पेरण्या संकटात
समुद्रपूर : अपुऱ्या पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या पूर्ववत होताच पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी, दुबार पेरण्या संकटात सापडल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
समुद्रपूर तालुक्यात अपुऱ्या पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. सोमवारी ला झालेल्या दमदार पावसाने शेतकरी सुखावला. दरम्यान खोळंबलेल्या पेरण्या पूर्ववत झाल्या. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी जून महिन्यात आलेल्या तुरळक पावसात कपाशी पिकाची लागवड केली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतात टाकलेले बियाणे करपले. या स्थितीची कृषी विभागाकडून दखल घेण्यात आली असून, याबाबत अहवाल पाठविण्यात आला असल्याची माहिती मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी दिली. परंतु पाच दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याचे दुबार पेरण्या संकटात सापडलेल्या आहे.
पावसाने खंड न दिल्यास अंकूरणारे बीज जमिनीतच सडण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर तिसऱ्यांदा पेरणीचे संकट ओढावले जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात २६४ मिलीमिटर पाऊस झाला आहे. सतत पाऊस असल्याने शेतीचे कामे ठप्प पडली असून शेतात तन वाढू लागले आहे. दुबार पेरणीमुळे यावर्षी लागवडीच्या खर्चात तिपटीने वाढ झाली आहे.दरवर्षीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हादरला आहे. पैशांची तडजोड करण्यासाठी शेतकरी सावकारारकडे जमीन गहाण करीत आहे. शिवाय बँकांचे कर्ज थकीत आहे. त्यामुले पुन्हा कर्ज मिळत नाही. अशा भयावह परिस्थितीत दुबार, तिबार पेरणीच्या संकटातून शेतकऱ्यांना सावरणे जिकरीचे झाले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)