श्रमदानातून ट्रामा केअर युनिटमध्ये विलगीकरण कक्षाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:00 IST2020-04-15T05:00:00+5:302020-04-15T05:00:15+5:30
सद्या स्थितीत स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध विलगिकरण कक्षात १० साधे तर ५ बेड अतिदक्षता विभागासाठी आहेत. शिवाय दोन व्हेंटिलेटर आहे. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे दक्षता म्हणून आणखी एकूण ३५ खाटांचे महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे दोन विलगिकरण कक्ष अडगळीत पडलेल्या चांगल्या इमारतीत किळकोळ डागडुजी करून करण्यात येत आहे.

श्रमदानातून ट्रामा केअर युनिटमध्ये विलगीकरण कक्षाची निर्मिती
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील उपजिल्हा रुग्णालयातील अद्याप लोकार्पण न झालेल्या ट्रामा केअर युनिट मध्ये १५ खाटांच्या अद्यावत विलगिकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. १५ खाटांच्या दोन कक्षांच्या किरकोळ डागडुजीची कामे कासवगतीने सुरु आहे. कोरोनाबाबतचा संभाव्य धोका लक्षात घेऊन याच रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट मध्ये श्रमदानातून विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे.
सद्या स्थितीत स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध विलगिकरण कक्षात १० साधे तर ५ बेड अतिदक्षता विभागासाठी आहेत. शिवाय दोन व्हेंटिलेटर आहे. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे दक्षता म्हणून आणखी एकूण ३५ खाटांचे महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे दोन विलगिकरण कक्ष अडगळीत पडलेल्या चांगल्या इमारतीत किळकोळ डागडुजी करून करण्यात येत आहे. ही इमारत उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचाच मागील भाग आहे. सद्याच्या लॉकडाऊनच्या स्थितीत यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध होणे कठीण बाब ठरत आहे. अशा परिस्थिती डॉक्टर, परिचारिका, कक्ष परिसेवक आदींनी श्रमदान करून ट्रामा केअर युनिटला स्वच्छ व निजंर्तुक केले. तसेच ५० लोखंडी बेडची रंगरंगोटी केली. नगदी शिवाय साहित्य द्यायला कोणीच तयार नाही त्यामुळे उसनवारी करून जवळपास सव्वा लाखांची जुळवाजुळव करून काम केल्याचे अधीक्षक डॉ. किशोर चाचरकर म्हणाले. दोन कक्षांच्या निर्मिती नंतर येथील अद्ययावत विलगिकरण कक्षात एकूण ५० खाटा उपलब्ध होणार आहे हे विशेष.
उपजिल्हा रुग्णालयातील इमारतीची डागडुजीचे किरकोळ कामे विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. तरी येत्या आठ दिवसांत प्रलंबित कामे पूर्ण करण्यात येईल.
- दिलीप कुटे, उपविभागीय अभियंता, सा. बां. हिंगणघाट.