शाळा फुलविण्यासाठी ‘सूर नवा, ध्यास नवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:10 IST2019-06-03T22:09:46+5:302019-06-03T22:10:03+5:30

इंग्रजी शाळांकडे विद्यार्थ्यांची धाव असल्याने मराठी शाळा ओस पडत आहे. त्यामुळे यावर्षी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ‘सूर नवा, ध्यास नवा; जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश हवा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक शाळांनी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीच्या सभापती जयश्री सुनिल गफाट यांनी केले आहे.

To create a school, 'Sur Nava, Dhasak Nava' | शाळा फुलविण्यासाठी ‘सूर नवा, ध्यास नवा’

शाळा फुलविण्यासाठी ‘सूर नवा, ध्यास नवा’

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे अभियान : शाळापूर्व तयारीचे केले नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : इंग्रजी शाळांकडे विद्यार्थ्यांची धाव असल्याने मराठी शाळा ओस पडत आहे. त्यामुळे यावर्षी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ‘सूर नवा, ध्यास नवा; जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश हवा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक शाळांनी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीच्या सभापती जयश्री सुनिल गफाट यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात शाळापूर्व तयारी नियोजन सभा पार पडली. या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, समाजकल्याण समितीच्या सभापती नीता गजाम, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. एस. एन. पटवे, उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मिक इंगोले, ज्येष्ठ अधिव्याख्याता मंजुषा औंढेकर, जिल्हा समन्वयक प्रशांत पवार यांची उपस्थिती होती. पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी कोणकोणते नवोपक्रम राबवावे व शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांची माहिती पालकांपर्यंत कशी पोहोचवावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सोबतच नविन सत्र सुरु होण्याच्यापूर्वीच्या दिवशी कारावयाच्या कार्यवाहिबाबत पावर पॉर्इंट प्रेजेंटेशन करण्यात आले. प्राथमिक शिक्षण विभागाला नवीन बांधकामाकरिता ५ कोटी व दुरुस्तीकरता १ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच शाळांमध्ये पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. सर्व शाळांना भौमिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असून शाळांचे रुप बदलविण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही सभापती गफाट यांनी यावेळी सांगितले. या नियोजन सभेला सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आता २६ जूनच्या पहिल्या ठोक्याला शाळा काय कार्यक्रम घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: To create a school, 'Sur Nava, Dhasak Nava'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.