शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

कुरझडी पुलावरील खड्डा ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

कुरझडी-जामठा या मार्गाने दररोज अनेक नागरिक आवागमन करतात. रस्त्यावर असलेल्या पुलावर भलामोठा खड्डा पडला असून काही दिवसांपूर्वी त्या खड्ड्यात ट्रकचे चाफ फसले होते. तसेच या मार्गाने ये-जा करणाºया अनेकांचे अपघात होवून त्यांना गंभीर मार लागला आहे. याबाबत अनेकदा संबंधित विभागाला तक्रारी करून खड्डा बुजविण्याची मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : अपघातमालिका सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव(नि.) : नजिकच्या कुरझडी ते जामठा या प्रमुख मार्ग असून रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा सध्या आवागमन करणाऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. याकडे मात्र, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असून रस्त्यावरील खड्डा तत्काळ न बुजविल्यास आंदोलन करण्याचा इशारा सरपंच किरण चौधरीसह ग्रामस्थांनी दिला आहे.कुरझडी-जामठा या मार्गाने दररोज अनेक नागरिक आवागमन करतात. रस्त्यावर असलेल्या पुलावर भलामोठा खड्डा पडला असून काही दिवसांपूर्वी त्या खड्ड्यात ट्रकचे चाफ फसले होते. तसेच या मार्गाने ये-जा करणाºया अनेकांचे अपघात होवून त्यांना गंभीर मार लागला आहे. याबाबत अनेकदा संबंधित विभागाला तक्रारी करून खड्डा बुजविण्याची मागणी करण्यात आली. पण, संबंधित विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येते आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने ठराव घेऊन संबंधित विभागाला ठरावाची प्रत दिली. पण, अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही.याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कुरझडीचे सरपंच किरण चौधरी, बालू धनविज, मनोज चौधरी, सुभाष तळवेकर, बंडू धनविज, अतुल भोस्कर, सूरज गरड आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे.लोखंडी सळाखी उघड्या पडल्याने अनेकांचे अपघातकुरझडी ते जामठा रस्त्यावर असलेल्या पुलाच्या मधात मोठाला खड्डा पडला आहे. रात्रीच्या सुमारास आवागमन करणाºया नागरिकांना खड्डा दिसत नसल्याने दररोज अपघात होत आहे. इतकेच नव्हेतर रस्त्यावरिल लोखंडी सळाखा उघड्या पडल्या असून वाहनांचे चाक त्या सळाखीवरून जात अपघात घडत आहेत. अनेकांच्या वाहनांचे नुकसान झाले असून एखाद्याचा जीव गेल्यावरच संबंधित विभागाला जाग येईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मुख्य रस्त्यावरील पुलावर अनेक दिवसांपासून मोठाला खड्डा पडलेला आहे. त्याबाबत ग्रामपंचायतीतर्फे ठराव घेऊन बांधकाम विभागाला त्याबाबतचे पत्रही दिले आहे. पण, याची दखल घेतल्या गेली नाही.-किरण चौधरी, सरपंच कुरझडी(जा.)