शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘रॅपिड अ‍ॅन्टिजेन किट’द्वारे वर्ध्यात कोविड चाचणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

एक हजार रॅपिड अ‍ॅन्टिजेन किट प्राप्त झाल्यावर सदर किट जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शासकीय रुग्णालयांसह सेवाग्राम आणि सावंगी येथील रुग्णालयात पाठविण्यात आल्या. परवानगी मिळाल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय तसेच सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात या किटद्वारे कोविड चाचणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१०० व्यक्तींची झाली टेस्ट। आयसीएमआरच्या सूचनांचे होतेय काटेकोरपणे पालन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड चाचणीच्या कामात गती यावी या हेतूने जिल्ह्यात रॅपिड अ‍ॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी करण्यास सुरूवात झाली आहे. सध्या तीन रुग्णालयात या किटद्वारे कोविड चाचणी सुरू करण्यात आली असून आतापर्यंत १०० व्यक्तींची टेस्ट करण्यात आली आहे. सदर टेस्ट करताना आरोग्य यंत्रणेकडून आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.एक हजार रॅपिड अ‍ॅन्टिजेन किट प्राप्त झाल्यावर सदर किट जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शासकीय रुग्णालयांसह सेवाग्राम आणि सावंगी येथील रुग्णालयात पाठविण्यात आल्या. परवानगी मिळाल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय तसेच सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात या किटद्वारे कोविड चाचणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये या किटद्वारे केलेल्या टेस्टचा अहवाल प्राप्त होत असून सध्या ही किट वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरत आहे. परवानगी मिळाल्यापासून आतापर्यंत एकूण १०० व्यक्तींची कोविड चाचणी या किटद्वारे करण्यात आल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यातील तीन रुग्णालयात चाचणीनागपूर येथून रॅपिड अ‍ॅन्टिजेन किट प्राप्त झाल्यानंतर त्या आठही तालुक्याच्या स्थळी असलेल्या रुग्णालयात पाठविण्यात आल्या आहेत. सध्या तीन रुग्णालयात चाचणीला परवानगी मिळाली असून यात सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय, सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचा समावेश आहे. इतर ठिकाणीही कोविड चाचणीला परवानगी मिळाल्यावर तालुका स्थळावरील शासकीय रुग्णालयांमध्ये या किट द्वारे कोविड चाचणी केली जाणार आहे.४५ ते ५० मिनिटात स्पष्ट होतो अहवालरॅपिड अ‍ॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी केल्यास त्याचा अहवाल अवघ्या ४५ ते ५० मिनिटांत स्पष्ट होतो. पे्रगा टेस्ट किट सारखीच ही किट असून या किटवर संशयीताच्या घशातील द्रवाचे नमुने टाकल्यावर काही मिनिटांत सदर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे काय याची शहानिशा होत असल्याचे सांगण्यात आले.आठ जणांचे अहवाल आलेत पॉझिटिव्हरॅपिड अ‍ॅन्टिजेन किटचा वापर करून आतापर्यंत एकूण सुमारे १०० संशयीत व्यक्तीची कोरोना पॉझिटिव्ह आहेत काय याची शहानिशा करण्यात आली. त्यापैकी आठ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.दहा हजार किटची नोंदविली मागणी; लवकरच किट प्राप्त होण्याची शक्यतासध्या एक हजार रॅपिड अ‍ॅन्टिजन किट वर्धा जिल्ह्यासाठी मिळाल्या असून त्यापैकी १०० किटचा वापर आतापर्यंत करण्यात आला आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने वरिष्ठांकडे दहा हजार रॅपिड अ‍ॅन्टिजन किटची मागणी केली आहे.रॅपिड अ‍ॅन्टिजेन किटद्वारे वर्धा जिल्ह्यातील तीन रुग्णालयात कोविड चाचणी सुरू करण्यात आली आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन दहा हजार किटची मागणी करण्यात आली आहे. आयसीएमआरच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन या चाचण्या केल्या जात आहेत.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या