लाकडी दांड्याने मारहाण करून स्वयंपाकीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:16 IST2019-01-16T00:14:08+5:302019-01-16T00:16:43+5:30

भाजीच्या कारणावरून वाद करून लाकडी दांड्याने ढाब्यावरील पुरुष स्वयंपाकीला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना नजीकच्या धोत्रा रेल्वे परिसरात घडली असून मंगळवारी दुपारी उघडकीस आली. शिवराम अरविंद चावरे (३७) रा. झाडा ता. धामणगाव जि. अमरावती, असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Cousin murdered by a wooden ass | लाकडी दांड्याने मारहाण करून स्वयंपाकीची हत्या

लाकडी दांड्याने मारहाण करून स्वयंपाकीची हत्या

ठळक मुद्देधोत्रा (रेल्वे) शिवारात आढळला मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भाजीच्या कारणावरून वाद करून लाकडी दांड्याने ढाब्यावरील पुरुष स्वयंपाकीला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना नजीकच्या धोत्रा रेल्वे परिसरात घडली असून मंगळवारी दुपारी उघडकीस आली. शिवराम अरविंद चावरे (३७) रा. झाडा ता. धामणगाव जि. अमरावती, असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सुत्रानुसार, धोत्रा रेल्वे शिवारात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याची माहिती सावंगी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत बारकाईने पाहणी केली असता मृतकाच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या इजा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी आपल्या हालचालिंना वेग देत खात्रीदायक माहितीच्या आधारे काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तब्बल एक तासांच्या प्रयत्नाअंती मृतकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. मृतक हा धोत्रा रेल्वे शिवारातील ढाब्यावर स्वयंपाकी म्हणून काम करून कुटुंबाचे पालन-पोषण करीत होता. चौकशीदरम्यान मृतक शिवराम याच्याशी भाजीच्या कारणावरून वाद झाल्याचे पुढे आले. याच वादाचे हाणामारीत रुपांतरण होत त्याची हत्या करण्यात आली असावी, असा कयास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सावंगीचे ठाणेदार दत्तात्रय गुरव, पोलीस कर्मचारी ओमप्रकाश नागापूरे, विजय पंचटीके, श्रावण पवार, साखरे, दुर्गेश बामटे आदींनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद सावंगी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Cousin murdered by a wooden ass

टॅग्स :Murderखून