जाती आधारावर ठरणार कापसाचे भाव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 05:00 IST2020-10-11T05:00:00+5:302020-10-11T05:00:20+5:30

शासकीय हमी दराने कापूस विक्रीसाठी नोंदणी अर्ज भरण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात अर्ज भरण्यात येत आहे. अर्ज भरून नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांला प्रथम नोंदणी या आधारावर कापूस विक्रीकरिता आणावा लागेल या अर्जामध्ये जमीन क्षेत्रफळ नाव पेरापत्रक, बँकपासबुक, आधारकार्डाचा उल्लेख करावा लागतो. मात्र, नोंदणी अर्जात पुन्हा जातीचा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आल्याचे दिसून आल्याने शेतकऱ्यांत रोष निर्माण झाला आहे.

Cotton prices based on caste? | जाती आधारावर ठरणार कापसाचे भाव?

जाती आधारावर ठरणार कापसाचे भाव?

ठळक मुद्देनोंदणी अर्जात जातीचा उल्लेख : शेतकऱ्यांत रोषाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : यावर्षी भरण्यात येत असलेल्या नोंदणी अर्जात परत जातीचा उल्लेख आल्याने आता शेतकऱ्यांना कापसात जातीची गरज काय, तसेच जातीनुसार भावात कमी जास्त होणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
शासकीय हमी दराने कापूस विक्रीसाठी नोंदणी अर्ज भरण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात अर्ज भरण्यात येत आहे. अर्ज भरून नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांला प्रथम नोंदणी या आधारावर कापूस विक्रीकरिता आणावा लागेल या अर्जामध्ये जमीन क्षेत्रफळ नाव पेरापत्रक, बँकपासबुक, आधारकार्डाचा उल्लेख करावा लागतो. मात्र, नोंदणी अर्जात पुन्हा जातीचा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आल्याचे दिसून आल्याने शेतकऱ्यांत रोष निर्माण झाला आहे.
मागीलवर्षी जात नोंदणीबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच महाराष्ट्राच्या विधीमंडळात त्याची दखल घेतली व अध्यक्षांनी जातीचा उल्लेख न करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, यावर्षी भरण्यात येणाऱ्या अर्जात पुन्हा जातीचा उल्लेख आल्याने शेतकऱ्यांना कापसात जातीची गरज काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मला बाजार समितीच्या सभापतींनी अर्जाचा नमूना दिला. त्यानुसार नोंदणी अर्ज छापून आणण्यात आले. व ते अर्ज कृषी उत्पन्न बाजार समितीचा शिक्का मारुन शेतकऱ्यांना देण्यात आले.
- दीपक नांदे, प्रभारी लेखापाल, बाजार समिती, पुलगाव.

Web Title: Cotton prices based on caste?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.