सीसीआयमुळे कापूस उत्पादक संभ्रमात
By Admin | Updated: January 31, 2015 23:24 IST2015-01-31T23:24:40+5:302015-01-31T23:24:40+5:30
जिल्ह्यात पुलगाव देव्ळी, रोहणा, आर्र्वी, हिंगणघाट, समुद्रपूर, कोरा व सिंदी (रेल्वे) येथील भारतीय कापूस निगमची कापूस खरेदी जागे अभावी बंद करण्यात आली. या केंद्रात सध्या व्यापाऱ्यांची कापूस

सीसीआयमुळे कापूस उत्पादक संभ्रमात
व्यापाऱ्यांची खरेदी सुरू : कापसाला व्यापाऱ्यांकडून ३,६०० रुपयांचा दर
फनिंद्र रघाटाटे - रोहणा
जिल्ह्यात पुलगाव देव्ळी, रोहणा, आर्र्वी, हिंगणघाट, समुद्रपूर, कोरा व सिंदी (रेल्वे) येथील भारतीय कापूस निगमची कापूस खरेदी जागे अभावी बंद करण्यात आली. या केंद्रात सध्या व्यापाऱ्यांची कापूस खरेदी सुरू आहे. सीसीआयची कापूस खरेदीत असलेली उदासीनता कापूस उत्पादकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.
जागतिक मंदीच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव पडले, असे वातावरण निर्माण करीत व्यापाऱ्यांनी ३,६०० ते ३,८०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी सुरू केली आहे. शासनाचे हमीभाव ४,०५० रुपये असून नाकमुरडत केंद्र शासनाच्या अधिनस्त असणाऱ्या सीसीआयने जिल्ह्यातील काही निवडक केंद्रावर प्रथम आखुड धाग्याचा कापूस संबोधन ३,९५० रुपये व नंतर तोच कापूस ४,०५० रुपये दराने खरेदी केला. कमीतकमी कापूस खरेदी करणे ही मानसिकता सीसीआयची असल्याने शंभरच्यावर गाड्या न मोजने, शनिवार व रविवारला खरेदी बंद ठेवणे, याबाबीचा सीसीआय अधिकारी नेहमीच आधार घेत राहिले. याचा लाभ व्यापाऱ्यांना झाला.