शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांचा कापूस शेतातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:54 IST

सोयाबीन निघाले, कपाशीची बोंडे फुटल्याने हिरवे शेत पांढरे दिसत आहे.

ठळक मुद्देदर तर नाहीच;मजुरीही कंबर मोडणारीच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सोयाबीन निघाले, कपाशीची बोंडे फुटल्याने हिरवे शेत पांढरे दिसत आहे. हा कापूस वेचून तो बाजारात विकाचा अशी प्रत्येक शेतकºयाची इच्छा आहे़; पण मजुरच मिळत नसल्याने त्यांची ही अपेक्षा हवेतच विरत आहे. मजुरांअभावी शेतकºयांचे पांढरे सोने शेतातच पडून असल्याचे दिसत आहे.यंदाचा खरीप हंगाम शेतकºयांकरिता लाभाचा कमी त्रासाचाच अधिक राहिला. प्रारंभी पावसाने मारलेल्या दडीने अनेक कापूस उत्पादकांची मोड झाली. त्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. यातही उत्पादन निघण्याच्या काळात परतीच्या पावसाने कापूस ओला झाला. शिवाय दमट वातावरणामुळे बोंडे काळी पडली. सरकीला कोंंबे फुटली. यामुळे शेतकºयाचे चांगलेच नुकसान झाले. यात आता बोंडे फुटून कापूस बाहेर येते येवू लागला आहे. हा वेचण्याची तयारी कापूस उत्पादकांकडून होवू लागली असताना शेतकºयांना मजुरीच्या दराचा फटका बसत आहे.साधारणत: दिवाळीपासूनच कापसाचा हंगाम सुरू होतो. यंदा याला थोडा विलंब होईल असे वाटत होते. पण ज्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली त्यांच्या पºहाटीला कापूस आला आहे. या कापसामुळे शेत पांढरी दिसू लागली आहे. मात्र हा कापूस वेचण्याकरिता मजुरच मिळत नसल्याने शेतकºयांची चांगलीव गोची झाली आहे.काही भागात अद्यापही सोयाबीनची काढणी सुरू आहे. या काढीची मजुरी शेतकºयांकडून अधिक मिळत असल्याने कापूस वेचणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी शेतातील कापूस तसाच असल्याचे दिसनू आले आहे.वाढीव मजुरीसह ने-आण करण्याचाही खर्चशेतमजुरांच्या मजुरीत ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तुलनेत दर मात्र कमी आहे. मजुरांची वाढीव मजुरी देण्याबाबत शेतकरी चिंतेत असताना यात आणखी भर म्हणते मजुरांना ने आण करण्याचा खर्चही त्यांनाच करावा लागत आहे. परिणामी शेतकºयाच्या खर्चात आणखीच वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. अशा स्थितीमुळे काही शेतकºयांच्या शेतात अजूनही सितदहीसाठी मजूर मिळाले नसल्याचे वास्तव आहे. जमिनीच्या मशागतीचा खर्च, बियाणे, खते, आंतरमशागत, पीक काढणे हा सर्व खर्च वजा जाता नफा मिळतो की तोटा असा प्रश्न निर्माण झाला आहे.कापूस वेचणीत किलोमागे चार रुपयांची वाढवर्धा जिल्ह्यात गत वर्षी ५ ते साडेपाच रुपये किलो वेचणीचा दर आता ९ रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे एक क्विंटल कापूस वेचण्याकरिता ७०० ते ९०० रुपयांचा खर्च पडत आहे. हा वाढीव भाव देणाºया शेतकºयांकडे मजुरांचा ओढा वाढत आहे. ज्यांच्याकडे सोय आहे त्यांना हा दर देणे शक्य आहे. पण ज्यांच्याकडे सोय नाही त्यांना हा भाव परवडणारा नाही. मजुरांना योग्य मजुरी दिली नाही तर कापूस तसाच शेतात राहण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या वाढत असलेली मजुरी आणि कापसाला मिळत असलेला अत्यल्प दर यामुळे शेतकरी मेटाककुटीस आला आहे. यामुळे कापसाचा वेचा कसा करावा असा प्रश्न त्यांना पडला आहे.