११५ शेतकऱ्यांचा कापूस घरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:00:23+5:30
नोंदणी केलेल्या तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी कापूस विकला काय याची चौकशी शासकीय यंत्रणेकडून करण्यात आल्यावर तब्बल ४२ शेतकऱ्यांच्या घरी कापूस असल्याचे पुढे आले. हा कापूस वेळीच खरेदी केला जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. परंतु, नोंदणी करताना या शेतकऱ्यांनी सातबारा जोडला नसल्याचे पुढे आल्याने या कापूस उत्पादकांच्या घरी कापूस शिल्लक आहे. शिवाय त्याची खरेदीही करण्यात आलेली नाही.

११५ शेतकऱ्यांचा कापूस घरीच
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी शासनाकडे नोंदणी केली. परंतु, अद्यापही या शेतकऱ्यांचा कापूस शासकीय यंत्रणेने खरेदी न केल्याने या कापूस उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. या शेतकऱ्यांचा कापूस वेळीच खरेदी करण्यात यावा अशी मागणी आहे.
नोंदणी केलेल्या तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी कापूस विकला काय याची चौकशी शासकीय यंत्रणेकडून करण्यात आल्यावर तब्बल ४२ शेतकऱ्यांच्या घरी कापूस असल्याचे पुढे आले. हा कापूस वेळीच खरेदी केला जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. परंतु, नोंदणी करताना या शेतकऱ्यांनी सातबारा जोडला नसल्याचे पुढे आल्याने या कापूस उत्पादकांच्या घरी कापूस शिल्लक आहे. शिवाय त्याची खरेदीही करण्यात आलेली नाही. यापूर्वी तालुक्यातील २,५२१ शेतकऱ्यांनी रितसर नोंदणी करून शासनाला कापूस विकाला आहे. ११५ शेतकऱ्यांच्या घरी कापूस शिल्लक राहिल्याने त्यांनी उपनिबंधक कार्यालयाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीकडे विनंती अर्ज सादर केला. त्यानंतर चौकशी करण्यात आली. पण अजूनही या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात न आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्वच नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आल्याचा दावा जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता; पण या प्रकरणाने पितळच उघडे पडले आहे.
११५ शेतकऱ्यांनी कापूस विकत घेण्याकरिता अर्ज केला होता. त्यापैकी ४२ शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. काही शेतकऱ्यांचे पेरेपत्र आणि सातबारा अर्जासोबत मिळाले नसल्याने ही परिस्थिती ओढावली. येत्या काही दिवसांत या शेतकऱ्यांचा कापूस विकत घेणार आहे.
- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक,वर्धा.
तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांचा कापूस विकत घेण्याकरिता अर्ज आम्हाला प्राप्त झाला. हा अर्ज उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविण्यात आला. चौकशीअंती यातील यातील ३३ शेतकऱ्यांचा कापूस विकत घेणार असल्याचे अहवालात नमूद आहे. मंजूरी आल्यावर या शेतकऱ्यांचा कापूस मार्केट यार्ड मध्ये बोलावून विकत घेतला जाईल.
- विनोद कोटेवार, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, आर्वी.