CoronaVirus News: गुडगाव येथील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 04:14 PM2020-06-28T16:14:08+5:302020-06-28T16:14:38+5:30

9 जूनला सामान्य रुग्णालयात  त्यांचा घशातील स्त्राव घेऊन कोरोना तपासणीला पाठविण्यात आला होता.

CoronaVirus News: Corona patient dies in Gudgaon | CoronaVirus News: गुडगाव येथील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

CoronaVirus News: गुडगाव येथील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

Next

वर्धा : दत्तपुर येथे सौरऊर्जेवर प्रकल्प  उभारण्यासाठी आलेले गुडगाव येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज सेवाग्राम येथे मृत्यू झाला.दत्तपुर येथे महारोगी सेवा संस्थेच्या परिसरात सोलर एनर्जीवर आधारित प्रकल्प उभारणीसाठी  5 जूनला गुडगाव येथून 65 वर्षीय पुरुष पत्नीसोबत कारने वर्धेत आले होते. त्यांना 6 जूनला दत्तपुर येथील विश्राम गृहात विलगीकरण करण्यात आले.  

9 जूनला सामान्य रुग्णालयात  त्यांचा घशातील स्त्राव घेऊन कोरोना तपासणीला पाठविण्यात आला होता.  11 जूनला  रात्री त्यांना जास्त त्रास झाल्यामुळे 1 वाजता रुग्णवाहिकेने सेवाग्राम येथे भरती करण्यात आले होते. 12 जुनला त्यांचा  स्त्राव तपासणी अहवालात  त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालायत उपचार सुरू होते.  

मधुमेह आणि उच्च राकदाब या दोन व्याधी असल्यामुळे  सुरुवातीपासूनच त्यांना अति दक्षता वार्डमध्ये   व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. 15 दिवस त्यांच्या प्रकृतीत चढउतार सुरू होते. तथापि परवापासून त्यांनी  औषधोपचाराला प्रतिसाद देणे  कमी केले होते. अखेर आज सकाळी 10 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर वर्धा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  
 
 त्यांच्यासोबत असलेली पत्नी आणि नंतर आलेला मुलगा यांचा अहवाल मात्र कोरोना करिता निगेटिव्ह आला होता.  मुळचे मुंबईचे येथील रहिवासी बेस्ट कंपनीत त्यांनी  इंजिनियर म्हणून नोकरी केली होती. 2013 मध्ये ते दोन मुलांसोबत गुडगाव येथे वास्तव्यास गेले.सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने त्यांनी दत्तपुर येथे स्व खर्चांने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र दुर्दैवाने त्यांचे हे स्वप्न अर्धवट राहिले आणि  त्यांनीं वर्धेत शेवटचा श्वास घेतला.

Web Title: CoronaVirus News: Corona patient dies in Gudgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.