आर्वी तालुक्यात कोरोनाचे ‘त्रिशतक’ पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 05:00 AM2020-09-25T05:00:00+5:302020-09-25T05:00:07+5:30

येथील तालुका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण ९ हजार ९०२ नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आर्वी तालुक्यात खरांगणा, रोहणा व जळगाव या तीन मोठ्या आरोग्य प्राथमिक केंद्राचा समावेश आहे. याचा कार्यभार तालुका आरोग्य अधिकारी सांभाळतात. तर आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयाचा कार्यभार वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे असतो.

Corona's 'Trishatak' crossed in Arvi taluka | आर्वी तालुक्यात कोरोनाचे ‘त्रिशतक’ पार

आर्वी तालुक्यात कोरोनाचे ‘त्रिशतक’ पार

Next
ठळक मुद्दे२३८२ नागरिक विलगीकरणात : ७९३ हायरिस्क तर १५९८ लो-रिस्कमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : जिल्ह्यांतर्गत सीमा खुल्या झाल्याने आता गृहविलगीकरण आणि संस्थात्मक विलगीकरणाच्या संख्येत कमालीची घट झाली. एवढेच नव्हे तर तालुक्यातील कोविड रुग्णांचा दैनंदिन नेमका आकडा, झालेले मृत्यू, विलगीकरणतून मुक्त झालेल्यांची माहिती व्यवस्थित मिळत नसल्याने आरोग्य यंत्रणेची मोठी शोकांतिका आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आर्वी शहरात २४० तर ग्रामीण भागात ८५ वर पोहचली असून तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ३२०वर जाऊन पोहचली आहे. शहरात नऊ आणि ग्रामीण भागात दोन असे एकूण ११ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
येथील तालुका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण ९ हजार ९०२ नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आर्वी तालुक्यात खरांगणा, रोहणा व जळगाव या तीन मोठ्या आरोग्य प्राथमिक केंद्राचा समावेश आहे. याचा कार्यभार तालुका आरोग्य अधिकारी सांभाळतात. तर आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयाचा कार्यभार वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे असतो.
जळगाव प्राथमिक केंद्रात मुंबई येथून आलेले ४८ पुणे येथून आलेले १९६ तर इतर जिल्ह्यातून आलेले १७६३ असे एकूण २००७ नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तर रोहणा आरोग्य केंद्रांतर्गत मुंबई येथून आलेल्या १०६ व्यक्ती, पुणे येथून आलेल्या १७० इतर जिल्ह्यातील२४२१ असे एकूण २६९७ व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. खरांगणा केंद्रांतर्गत मुंबईहून आलेले २२, पुणे येथून आलेले १०८ तर इतर जिल्ह्यातून आलेले १८३८ असे एकूण १९६८ व्यक्तींचा समावेश होता. आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयांतर्गत मुंबईहून आलेले १२० पुण्यावरून आलेले ३३५ तर इतर जिल्ह्यातील २ हजार ७७५ असे ३२३० व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आजपर्यंत आर्वी तालुक्यातील ९ हजार ९०२ व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. सध्या ७९३ व्यक्ती हायरिस्क तर १ हजार ५८९ व्यक्ती लो रिस्कमध्ये असे एकूण २३८२ व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

घोराड येथे २० पॉझिटिव्ह रुग्ण
घोराड : दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता आलेख बघता घोराड येथेही रुग्णसंख्या वाढत आहे. घोराडात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २० वर पोहचली आहे. १५ व्यक्तींवर उपचार सुरु असून चार व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. तर एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. येथील आरोग्य उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेवकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून युद्धस्तरावर उपाययोजना राबविण्यात येत आहे. बाधित व्यक्ती राहत असलेला परिसर सील करण्याचे काम सुरु आहे. मात्र, गावात कोरोनाच

हिंगणघाटात कोविड-१९ बचाव समिती गठित
हिंगणघाट : तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी, ठाणेदार, न.प.चे मुख्याधिकारी, आमदार, नगरसेवक, सामाजिक संघटना, सामाजिक संस्था व व्यवसायिक संघटन तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या सहमतीने कोविड-१९ बचाव समितीचे गठण करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याचे गांभीर्य शहरातील नागरिकांनी घेतले नसल्याने आजघडीला शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. इतकेच नव्हे पर मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होत चालली आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणून साखळी तोडणे तितकेच गरजेचे आहे.

यासाठी काही दिवसांपासून शहरातील काही जागृत नागरिकांनी अधिकाऱ्यांशी व सर्व सामाजिक राजकीय संघटनांशी चर्चा करुन तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून शहरात २५ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर दरम्यान सात दिवसांसाठी जनसंचारबंदी करण्याचा निर्णय घेतला. २४ रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून माझे शहर,माझा परिवार या मोहिमेअंतर्गत कोरोनाची भयावहकता व नागरिकांची बचावात्मक घ्यावयाची काळजी या हेतूने शहरातील प्रमुख मार्गाने पथसंचलन करण्यात येणार आहे.

महिलेला श्र्वास घेण्यास त्रास होत असल्याने तीला पुलगाव येथील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता आॅक्सिजनची मात्रा कमी असल्याने त्यांना सावंगी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महिलेची कोरोना तपासणी केली असता महिला पॉझिटिव्ह आढळून आली. गावकºयांची दक्षता म्हणून आरोग्य अधिकारी अंकुश देशमुख, परिचरीका माला रायपुरे, सरपंच दुर्गाप्रसाद मेहरे, ग्रामविस्तार अधिकारी ईश्र्वर थूल, पोलीस पाटील निरज तुरके भवानी परिसराला भेट देऊन भवानी वॉर्डातील बाधित महिलेच्या संपर्कात येणारा परिसर सील केला.

Web Title: Corona's 'Trishatak' crossed in Arvi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.