शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus: विदर्भातील गरीबांना सरकारी शुल्कात मिळणार रेमडेसिवीर, नितीन गडकरींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 18:52 IST

Remedesivir News : वर्ध्यातील सेवाग्राम येथील एमआयडीसी परिसरातील जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडीसीवीरचे उत्पादन सुरू झाले आहे. येथे दररोज ३० हजार व्हायल्सची निर्मिती होणार आहेत. या कंपनीतील उत्पादनाची पाहणी करण्याकरिता ना. नितीन गडकरी वर्ध्यात आले होते.

वर्धा : येथे रेमडीसिवीरचे उत्पादन सुरू झाल्याने महाराष्ट्रातील काळाबाजार थांबणार आहे. जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यातील गरीबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर उपलब्ध होणार असून देशातील इतरही ठिकाणी पुरविले जाईल. पण, वर्धा जिल्ह्याला निश्चितच प्राथमिकता असेल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. (The poor in Vidarbha will get Remdesivir at a government fee, Nitish Gadkari's big announcement )वर्ध्यातील सेवाग्राम येथील एमआयडीसी परिसरातील जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडीसीवीरचे उत्पादन सुरू झाले आहे. येथे दररोज ३० हजार व्हायल्सची निर्मिती होणार आहेत. या कंपनीतील उत्पादनाची पाहणी करण्याकरिता ना. नितीन गडकरी वर्ध्यात आले होते. यावेळी त्यांनी उत्पादनाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. वर्ध्यात उत्पादन सुरु करण्याकरिता खुप प्रयत्न करावे लागले. पण, महाराष्ट्रातील अधिकारी, अन्न व औषधी प्रशासन विभाग, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, स्वीय सहायक मांडलेकर यांनी परवानगीकरिता सहकार्य केले. तसेच हैद्राबादच्या एका कंपनीने सगळे मानक व प्रयोगशाळेतील उपकरणे पूर्ण करण्यास मदत केली. त्यामुळेच कमी कालावधीत भारत सरकारची परवानगी मिळणारी जेनेटीक लाईफ सायन्सेस ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे, असेही ना. नितीन गडकरी म्हणाले. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, डॉ. महेंद्र क्षीरसागर, नगराध्यक्ष अतुल तराळे यांची उपस्थिती होती. वर्ध्यात ऑक्सिजनची कमी राहणार नाहीभिलाईवरून येणारे ट्रक येथे आणण्या बद्दलच्या सूचना दिल्या आहेत. २० टन सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालयाला देण्यात येईल. उर्वरित देवळीला स्टोअर करण्यात येईल. सेवाग्राम आणि सावंगी येथे २०-२० टन क्षमतेचे आॅक्सिजन प्रकल्प लवकरच उभे करण्यासाठी प्रयत्न करणार. सिलिंडरही वाढवू, पाहिजे तेवढे व्हेंटिलेटरही उपलब्ध करुन देऊन पण, त्याचा योग्य वापर व्हावा. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण पूर्णपणे तयार राहायला पाहिजे. एकाही मानसाचा आॅक्सिजन, औषधीविना मृत्यू होणार नाही, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशा सूचनाही ना.गडकरी यांनी यावेळी केल्या.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVidarbhaविदर्भremdesivirरेमडेसिवीरNitin Gadkariनितीन गडकरी