दोन महिलांसह पुरूषाचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 05:00 AM2020-09-10T05:00:00+5:302020-09-10T05:00:41+5:30

कोविड-१९ विषाणू वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना झपाट्यानेच आपल्या कवेत घेत आहे. शिवाय कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. बुधवारी आरोग्य विभागाला ७९६ व्यक्तींचे कोविड चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १८५ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.

Corona kills man with two women | दोन महिलांसह पुरूषाचा कोरोनाने मृत्यू

दोन महिलांसह पुरूषाचा कोरोनाने मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देकोविड मृतकांची संख्या ३७ : बुधवारी जिल्ह्यात आढळले नवे १८५ कोविड बाधित

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बुधवारी ३५ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असली तरी पुलगाव येथील एक पुरूष, वर्धा आणि हिंगणघाट येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. बुधवारी तीन कोविड बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोविड मृतकांची संख्या ३५ झाली आहे. मात्र, त्यापैकी एकाचा मृत्यू इतर आजाराने झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
कोविड-१९ विषाणू वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना झपाट्यानेच आपल्या कवेत घेत आहे. शिवाय कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. बुधवारी आरोग्य विभागाला ७९६ व्यक्तींचे कोविड चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १८५ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना सुमारे १०.१ च्या दराने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनीही मास्कचा वापर करणे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळत दक्ष राहण्याची गरज आहे. बुधवारी आढळलेल्या नवीन कोरोना बाधितांमध्ये १०२ पुरुष तर ८३ महिलांचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय, शासकीय कार्यालय तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमधील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित होत आहेत.

९८३ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर होतोय उपचार
सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय तसेच सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाला कोविड रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आले आहे. याच रुग्णालयात सध्या कोविड बाधितांवर उपचार होत असून सध्या या दोन्ही कोविड रुग्णालयात ९८३ अ‍ॅक्टिव्ह कोविड रुग्ण आहेत. त्यांना चांगली आरोग्य सूविधा देण्यासाठी डॉक्टर व रुग्णालय प्रशासन प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Corona kills man with two women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.