कोरोनामुळे शेतामध्येच बांधली जातेय लगीनगाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 05:00 IST2021-05-30T05:00:00+5:302021-05-30T05:00:06+5:30
अनेक विवाह सोहळे शेतीमध्ये होताना दिसत आहेत.राज्यात लॉकडाऊन लागल्यानंतर विवाह सोहळ्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालून दिल्याने विवाह सोहळे कमीत कमी वेळात साजरे करावे लागत आहेत. तालुक्यात ग्रामीण भागात मात्र विवाहाचे मुहूर्त साधत साध्या पद्धतीने शेतात छोटासा मंडप टाकून विवाह सोहळा होताना दिसत आहे. त्यामुळे अनाठायी खर्चाला आळा बसला आहे.

कोरोनामुळे शेतामध्येच बांधली जातेय लगीनगाठ
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे ग्रामीण भागात लग्नसोहळ्यासाठी मंगल कार्यालय व मंदिराऐवजी शेतीतच विवाह सोहळा करण्यास पसंती दिली जात आहे. अनेक विवाह सोहळे शेतीमध्ये होताना दिसत आहेत.
राज्यात लॉकडाऊन लागल्यानंतर विवाह सोहळ्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालून दिल्याने विवाह सोहळे कमीत कमी वेळात साजरे करावे लागत आहेत. तालुक्यात ग्रामीण भागात मात्र विवाहाचे मुहूर्त साधत साध्या पद्धतीने शेतात छोटासा मंडप टाकून विवाह सोहळा होताना दिसत आहे. त्यामुळे अनाठायी खर्चाला आळा बसला आहे. मोजक्याच आप्तेष्टांच्या उपस्थितीत विवाह होत आहे. गर्दी होऊ नये यासाठी वेगळी उपाययोजना करण्याची गरज नाही. विवाह समारंभासाठी निश्चित करून दिलेली संख्या थोडी वाढली तरी चालते, असेही बोलले जात आहे. शेतातील सोहळ्याचा पर्याय वर-वधूकडील मंडळी निवडत असल्याचे दिसून येते. विवाह हा जीवनातील महत्त्वाचा सोहळा असतो. विवाह सोहळा थाटामाटात संपन्न व्हावा, जेवढी वराडी मंडळीची उपस्थिती, तेवढेच मोठे लग्न म्हणून पत्रिका, मूळ पत्रिका हजारोने दिल्या जायच्या. जेवणावळी उठायच्या त्यासाठी वेगवेगळी मेनू तयार करायचे. परंतु, हे सर्व आताच्या कोरोनाकाळात तरी स्वप्नवत झाले आहे.
अत्तराऐवजी सॅनिटायझर, तर फुलांऐवजी मास्क
विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांचे अत्तर व सुगंधी पाणी मारून स्वागत केले जायचे. आता मात्र त्याची जागा सॅनिटायझरने घेतली आहे. आलेल्या पाहुण्यांना हातावर सॅनिटायझर दिले जाते. अनेक मुलांच्या हातात सॅनिटायझरच्या बाटल्या दिसत आहे. मंडपात प्रवेश करताना गुलाबाचे फूल आणि अक्षता दिल्या जायच्या. आता पाहुण्यांना मास्क दिल्या जात आहे. कोरोना संसर्गामुळे विवाह सोहळ्याचे हे नवे रूप पहावयास मिळत आहे.
शेतातील आखाड्यावर स्वयंपाक
शेतात एक छोटासा मंडप, आजूबाजूला असलेली झाडाची सावली, तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये अथवा शेतातील आखाड्यावर स्वयंपाक होत आहे. आलेली पाहुणे मंडळी शेतात सावलीसाठी झाडाचा आसरा घेताना दिसत आहे.