शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दोन बाधित रुग्ण आढळून आल्याने रुग्णालय दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक रुग्णसेवा सुरु राहणार आहे. दोन्ही रुग्णांच्या निकटसंपर्कात आलेल्यांचे स्वॅब घेऊन परिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. बाह्य रुग्णसेवा बंद करण्यात आल्याने रुग्णांची गैरसोय न होण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयासमोरील शिवाजी प्राथमिक शाळेत तपासणी रुग्ण उघडण्यात आला आहे.

ठळक मुद्देकक्षसेवकासह परिचारिका पॉझिटिव्ह : आर्वी तालुक्यातील बाधितांची संख्या पोहोचली २४ वर

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : शहरास ग्रामीण भागात शिरकाव करणाऱ्या कोरोना विषाणूने आता येथील उपजिल्हा रुग्णालयांत ‘एन्ट्री’ केली असून एका ५५ वर्षीय कक्षसेवकासह ३५ वर्षीय परिचारिकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता आर्वीत एकूण कोरोना बाधितांची संख्या आता २४ वर पोहोचली असून त्यापैकी दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाने थेट रुग्णालयात शिरकाव केल्याने आरोग्य प्रशासनाकडून युद्धस्तरावर उपाययोजना राबविणे सुरू आहे. उपजिल्हा रुग्णालयात टेस्टिंग सुरू झाल्या आहे.उपजिल्हा रुग्णालयातील कक्ष सेवक राहत असलेली वसाहत सील करण्याचे काम सुरू आहे. आरोग्य विभागातील एक कर्मचारी अमरावती येथून १५ रोजी श्रीहरी कॉलनी येथे परतला. याबाबत नागरिकांनी सतर्कता म्हणून नोडल अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. याची दखल घेत सर्व आरोग्य कर्मचाºयांना विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे अधीक्षक धरमठोक यांनी दिली. वाढती रुग्णसंख्या बघता आर्वी शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनतो की काय, अशी भीती नागरिकांमध्ये आहे.एसडीपीओ क्वारंटाईनउपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे हे कोरोना काळात नाशिक येथे कर्तव्य बजाविण्यासाठी गेले होते. ते गावात परतताच त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले असून आरोग्य विभागातील एका कर्मचाºयालाही विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती आहे.उपजिल्हा रुग्णालय दोन दिवस बंदआर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दोन बाधित रुग्ण आढळून आल्याने रुग्णालय दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक रुग्णसेवा सुरु राहणार आहे. दोन्ही रुग्णांच्या निकटसंपर्कात आलेल्यांचे स्वॅब घेऊन परिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. बाह्य रुग्णसेवा बंद करण्यात आल्याने रुग्णांची गैरसोय न होण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयासमोरील शिवाजी प्राथमिक शाळेत तपासणी रुग्ण उघडण्यात आला आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या