दीक्षांत समारंभ; ७३ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके

By Admin | Updated: July 5, 2014 23:43 IST2014-07-05T23:43:15+5:302014-07-05T23:43:15+5:30

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ शनिवारी पार पडला़ समारंभात वैद्यकीय शाखेतील २२०, दंतविज्ञान शाखेतील १२४, आयुर्वेद शाखेतील ४३, पॅरामेडिकलच्या २३ व

Convocation; 73 students for the gold medal | दीक्षांत समारंभ; ७३ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके

दीक्षांत समारंभ; ७३ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके

४७६ विद्यार्थ्यांना दीक्षा : गडकरींची उपस्थिती
वर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ शनिवारी पार पडला़ समारंभात वैद्यकीय शाखेतील २२०, दंतविज्ञान शाखेतील १२४, आयुर्वेद शाखेतील ४३, पॅरामेडिकलच्या २३ व परिचर्या शाखेतील ६६ अशा एकूण ४७६ विद्यार्थ्यांना दीक्षा देण्यात आली़ ७३ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके प्राप्त केलीत तर तीन रौप्य पदके व ९ विद्यार्थ्यांनी चान्सलर पुरस्कार मिळविले़
दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलपती दत्ता मेघे तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी, आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे मुख्य सल्लागार डॉ़ वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ़ दिलीप गोडे, अ‍ॅड़ शशांक मनोहर, अशोक चांडक, कुलसचिव डॉ़ राजीव बोरले, वैद्यकीय शाखेचे अधिष्ठाता संदीप श्रीवास्तव, दंतविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ़ अशोक पखान, आयुर्वेद शाखेचे श्याम भुतडा, पॅरामेडिकलचे अधिष्ठाता डॉ़ जी़जे़ रामटेके, परिचारिका महा़चे प्राचार्य बी़डी़ कुळकर्णी, संचालक सागर मेघे, समीर मेघे, डॉ़ एस़एस़ पटेल, विद्यापीठाचे सदस्य डॉ़ अविचल कपूर, डॉ़ ए़जे़ अंजनकर, रवी मेघे, राजीव यशराय, डी़एस़ कुंभारे, डॉ़ नरेंद्र सामल, डॉ़ पल्लवी डायगव्हाणे आदी उपस्थित होते़ तत्पूर्वी, कुलपती दत्ता मेघे यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शाल, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला़ कुलगुरू डॉ़ दिलीप गोडे यांच्या हस्ते कुलपती दत्ता मेघे यांचाही सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमाची रूपरेशा कुलगुरू डॉ़ दिलीप गोडे यांनी मांडली तर अभिमत विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रम व उपक्रमांबाबत डॉ़ वेदप्रकाश मिश्रा यांनी माहिती दिली़ यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभागृहाला संबोधित केले़
दीक्षांत समारंभात वैद्यकीय शाखेतील रोमा सरनाईक, अंशुल चांडक, शुभम गुप्ता, करिष्मा माखीजा, तृप्ती जैन, डिंपी वाघेला, क्रीस्टीना मॅथ्यू, उदिती नायडू, केशव मल्होत्रा, श्रूती गोयल, मंजिरी चौलवार, निशा सुराना, अनुपम गोयल, किरण गिरी, उदितकुमार अग्रवाल, मोनाली राजूरकर, वैभव कुमार, गुंजन नितनवरे, मयूरी येवले, प्रियंका गोयल, पियूश पाटील, कविता सुदर्शन, जयकुमार शर्मा, अल्का सिंग, प्रिया सिंग, अमोल आकरे या विद्यार्थ्यांनी विविध विषयात सुवर्णपदके व अन्य पुरस्कार प्राप्त केले़ दंतविज्ञान शाखेतील फे्रस्का अडवाणी, केतकी जोगळेकर, धनश्री बांबल, राहूल गांधी, रश्मी अग्रवाल, अनन्या हजारे, भूमिका सहदेव, अर्चित घांगुर्डे, स्रेहा काशिकर, कविता होतवाणी यांनाही सुवर्णपदके व पुरस्कार देण्यात आले़ पॅरामेडिकल शाखेतील अहमिंद्रा जैन, रूचिका चावके यांना तर नर्सिंग शाखेतील टिन्सी राचेल, सौम्या बेबी, आशिष मानकर, मनिषा चौहाण, नीनू ट्रेसा, टेस्सी मॅथ्यू, रिटा जस्टीन, संतोष शिंदे यांनाही सुवर्णपदके व पुरस्कार प्रदान करण्यात आलेत़
कार्यक्रमाचे संचालन डॉ़ श्वेता काळे पिसूळकर व डॉ़ समर्थ शुक्ल यांनी केले़ विद्यापीठ गीताने सुरू झालेल्या समारंभाची सांगता पसायदान व राष्ट्रगीताने करण्यात आली़ कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, माजी आमदार गिरीश गांधी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते़(कार्यलय प्रतिनिधी)

Web Title: Convocation; 73 students for the gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.