सतत परिवर्तन म्हणजेच शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 06:00 AM2019-12-16T06:00:00+5:302019-12-16T06:00:12+5:30

त:ची संवाद साधण्याची ताकत ज्यात आहे तोच खरा यशस्वी होतो. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी केले. ते राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.

Continuous change means education | सतत परिवर्तन म्हणजेच शिक्षण

सतत परिवर्तन म्हणजेच शिक्षण

googlenewsNext
ठळक मुद्देवसंत पुरके : मुख्याध्यापकांचे अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मुख्याध्यापकांमध्ये असणारे गुण आणि चातुर्य यावरून त्या शाळांची ओळख होते. शिक्षकांनी चांगल्या सवयी लावल्याशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही. व्यक्ती वर्तनातील सतत परिवर्तन म्हणजे शिक्षण असून रंजनमूल्ये आणि प्रबोधन मूल्य जोपासली तर प्रशिक्षण प्रभावी होते. स्वत:ची संवाद साधण्याची ताकत ज्यात आहे तोच खरा यशस्वी होतो. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी केले. ते राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.
अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी होते. व्यासपीठावर नागपूर बोर्डाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे, मारुती खेडकर, दीपक दोदल, नंदकुमार बारवकर, शत्रुघन बिडकर, युनुस पटेल, भागचंद आवताडे, शंकरराव निंबाळकर, मोहन पाटील, नरेशचंद्र वाळके, हरिभाऊ दंडारे, दीपक पुनसे, पांडुरंग साखरकर, अभिजित वंजारी, प्रकाश काळे, सतीश जगताप, मनोहर बारस्कर, प्रदीप गोमासे, दिलीप बोरकर, सतीश ठाकरे, रामेश्वर लांडे, रंजना दाते, हरीष पुनसे, मदन मोहता, संजय नांदे, देशमुख रवींद्र गोळे, बळीराम चव्हाण, मिलिंद सालोडकर, हरीष पुनसे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान विवेक अरोगे, अपूर्वा जगताप, साहिल पांडे याचा सत्कार करण्यात आला. प्रथम सत्रात शैक्षणिक गुणवत्ता शिक्षक व पालक भूमिका या विषयावर मराठवाडा विभागाचे शोध निबंध सादर केला. डॉ. वेदप्रकाश मिश्र म्हणाले की, मुख्याध्यापकाचे स्थान जगात उच्चस्थानी आहे; पण शासन आणि समाज मुख्याध्यापकाला योग्य स्थान आणि महत्त्व देत नाही. ही शोकांतिका आहे. रविकांत देशपांडे व राजेंद्र भुतडा यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. शिक्षण महर्षी रावसाहेब आवारी पुरस्काराने युनूस पटेल, नरेशचंद्र वाळके, मारोती खेडकर यांना गौरविण्यात आले. संचालन अतुल देवडे, मिलिंद मुळे, ज्योती भगत यांनी केले तर आभार प्रदीप गोमासे यांनी मानले.

Web Title: Continuous change means education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.