नागपूर-अमरावती मार्गावर कंटेनर उलटला; ३३ मजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 14:09 IST2020-05-12T14:08:45+5:302020-05-12T14:09:14+5:30

मुंबईतील भिवंडी येथून मजुरांना घेऊन इलाहाबादकडे जाणारा भरधाव कंटेनर कारंजा (घा.) तालुक्यातील नागपूर-अमरावती महामार्गावरील ठाणेगाव शिवारात उलटला. या अपघातात ३३ मजूर जखमी झाले.

Container overturned on Nagpur-Amravati route; 33 workers injured | नागपूर-अमरावती मार्गावर कंटेनर उलटला; ३३ मजूर जखमी

नागपूर-अमरावती मार्गावर कंटेनर उलटला; ३३ मजूर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: मुंबईतील भिवंडी येथून मजुरांना घेऊन इलाहाबादकडे जाणारा भरधाव कंटेनर कारंजा (घा.) तालुक्यातील नागपूर-अमरावती महामार्गावरील ठाणेगाव शिवारात उलटला. या अपघातात ३३ मजूर जखमी झाले. जखमींमध्ये तीन महिलांसह तीन मुलांचा समावेश आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी झाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजुरांमध्ये संभ्रम व दहशतीचे वातावरण आहे. परप्रांतीयांच्या घरवापसीसाठी केंद्र सरकारच्यावतीने विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडल्या जात असल्या तरी हाताला काम नसलेले मजूर मिळेल त्या साधनाने घर गाठण्यासाठी लगीन घाई करीत आहेत. असेच काही मजूर काही मजूर भिवंडी येथून कंटेनरने अलाहाबादच्या दिशेने निघाले होते. भरधाव कंटेनर नागपूर-अमरावती महामार्गावरील ठाणेगाव शिवारात आला असता वाहनचालकाचे वाहनावरिल नियंत्रण सुटले अशातच वाहन उलटले. यात कंटेनरमधील एकूण ३३ जण जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. जखमींपैकी चार व्यक्तींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सदर जखमींवर डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. इंदुरकर, डॉ. खुजे उपचार करीत आहेत.

 

Web Title: Container overturned on Nagpur-Amravati route; 33 workers injured

टॅग्स :Accidentअपघात