Container accident on Nagpur-Amravati highway; Driver killed | नागपूर-अमरावती महामार्गावर कंटेनरचा अपघात; ड्रायव्हर ठार
नागपूर-अमरावती महामार्गावर कंटेनरचा अपघात; ड्रायव्हर ठार

ठळक मुद्देजंगली जनावर आडवे आल्याने झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या सत्याग्रही घाटात बुधवारी मध्यरात्री २.४५ च्या सुमारास जंगली जनावर समोर आल्याने एका कंटेनरचा अपघात झाला. यात ड्रायव्हरचा मृत्यू झाला असून क्लीनर जखमी झाला आहे.
छत्तीसगडहून मुंबईकडे जात असलेल्या कंटेनर क्र. एम.एच. ०४ जे.के. समोर जनावर आडवे आल्याने ट्रकवरचे नियंत्रण सुटले व तो संरक्षक कठडा तोडून रस्त्याच्या कडेला उलटला. यात ट्रक ड्रायव्हर शेख जुल्फेकार रहूल हक (३५) हा जागीच ठार झाला तर क्लीन सद्दाम हुसेन आफताप आलम हा जखमी झाला आहे.

Web Title: Container accident on Nagpur-Amravati highway; Driver killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.