शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसजन रस्त्यावर; केंद्र सरकारचा केला निषेध

By अभिनय खोपडे | Updated: March 25, 2023 17:26 IST

आर्वी, कारंजा, सिंदी (रेल्वे) केंद्र सरकारचा निषेध

वर्धा :  सुरत न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसनेतेराहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केले. त्या निषेधार्थ जिल्ह्यातील काँग्रेसजन रस्त्यावर उतरले आहेत. आर्वी येथे माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. यावेळी देशातील लोकशाही धोक्यात आली आहे व अनेक संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्ष संपविण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी माजी आमदार अमर काळे, राजू रत्नपारखी, दिलीप जाधव, विशाल साबळे आदी उपस्थित होते.

कारंजा घाडगे येथेही काँग्रेसकडून केंद्राचा निषेध

कारंजा येथील गोळीबार चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी नितीन दर्यापूरकर, भगवान बुवाडे, भिकाराम चौधरी, गोपाळ घाडगे, प्रा.अंधारे, टिपू मोटवाणी, दिलीप राठी, राजेंद्र लाडके, हेमंत बन्नगरे, विशाल इंगळे, संजय मसकी, कमलेश कठाणे, गजू चाफले, सतीश इंगळे, योगेश चौधरी, भिकाराम मस्की, विशाल नासरे, विक्की भादे, एजाज शेख, अतुल मिसाळ, गजू भिलकर, रवी दुधाकर्वे आदी उपस्थित होते.

सिंदी (रेल्वे) शहर काँग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध

सिंदी शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाशचंद्र डफ यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने देशात हुकूमशाही निर्माण केली असून, सर्वसामान्यांचा पैसा ठरावीक उद्योगपतींच्या घशात घातला जात आहे, असा आरोप प्रकाशचंद्र डफ यांनी केला. यावेळी गजानन खंडाळे, ए. सी. कलोडे, किशोर सोनटक्के, फिरोज बेरा, अजय कलोडे, गुड्डू कुरेशी, मिलिंद बेले आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाagitationआंदोलन