संविधानाच्या अंमलबजावणीसाठी कॉँग्रेस कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST2020-02-08T06:00:00+5:302020-02-08T06:00:09+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले; मात्र त्याची पूर्णपणे अंमलबजावणी देशात होत नसल्याचे दिसून येत आहे. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय कॉँग्रेसचे प्रशिक्षण व संदेश प्रभारी सचिन राव यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने गाव तेथे शाखा या कार्यक्रमाचा प्रारंभ वर्धा येथे झाला.

Congress is committed to the implementation of the Constitution | संविधानाच्या अंमलबजावणीसाठी कॉँग्रेस कटिबद्ध

संविधानाच्या अंमलबजावणीसाठी कॉँग्रेस कटिबद्ध

ठळक मुद्देसचिन राव : जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या कार्यालयात मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले; मात्र त्याची पूर्णपणे अंमलबजावणी देशात होत नसल्याचे दिसून येत आहे. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय कॉँग्रेसचे प्रशिक्षण व संदेश प्रभारी सचिन राव यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने गाव तेथे शाखा या कार्यक्रमाचा प्रारंभ वर्धा येथे झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राष्ट्रीय समन्वयक मनोज बांगरिया, महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष विजय अंबोरे, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष धर्मपाल ताकसांडे, संजय मेश्राम, प्रतीभा उके, संजय रत्नपारखी, हर्षवर्धन निकोसे, बाबाराव कोकणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मनोज चांदूरकर तर संचालन व आभार प्रदर्शन विजय चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला महिला कॉँग्रेसच्या अध्यक्ष हेमलता मेघे, शहरध्यक्ष सुधीर पांगुळ, रामभाऊ सातव, सुकेशनी धनवीज, डॉ. रामकृष्ण मिरगे, मधुकर सोमकुवर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. राहुल तेलंग सिंदी (मेघे), संदीप नाखले पिपरी पुनर्वसन, विजय गोडघाटे हिंगणघाट, सविता ढोके दयालनगर, प्रज्ञा पाटील गोरक्षण वॉर्ड, संगीता वानखेडे वर्धा यांना गाव तेथे शाखा हे नियुक्तीपत्र देण्यात आले.

Web Title: Congress is committed to the implementation of the Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.