शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पाणीपुरवठ्याची कामे ३० मार्चपर्यंत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:50 PM

यंदाच्या वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस पडल्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी विहिरीतील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य द्यावे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : जिल्हा प्रशासनाची विशेष बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस पडल्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी विहिरीतील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य द्यावे. तसेच पाणी टंचाई आराखड्याचा टप्पा दोनमधील उपाययोजनेची कामे ३० मार्चपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी भिमनवार यांच्या अध्यतेखाली जिल्हा प्रशासनाची विशेष बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम जलाशयातील उपयुक्तसाठा ६८.४२० द.ल.घ.मी. असून एकूण तो साठवण क्षमतेच्या केवळ १३ टक्केच आहे. धाम प्रकल्पामध्ये ११.०२ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा शिल्लक असून त्याच पाण्याचा वर्धा शहर व लगतच्या गावामध्ये ३० जुनपर्यंत पुरवठा होणाहर आहे. ज्या गावामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते अशा गावांना तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी संयुक्त भेटी देऊन तातडीने तपासणी करून योग्य त्या उपाययोजना कराव्या. ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आहे, अशाच ठिकाणी विंधन विहिरी करण्यात याव्या. इतरत्र कुठेही विंधन विहिरी करू नये, असा सूचना जिल्हाधिकारी भीमनवार यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यात ६०२ गावांमध्ये ९५४ उपाययोजना प्रस्थावित करण्यात आल्या आहेत. यात जानेवारी मार्च या दुसºया टप्प्यात १९९ नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्तीची कामे प्रस्तावित करण्यात आली. तर एप्रिल ते जुन या तिसºया टप्प्यात १३७ नळ पाणीपुरवठा योजनाची कामे प्रस्तावित आहे. सदर योजनांचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ सादर करावे. १३५ गावातील टप्पा तीन मधील १३७ विशेष दुरुस्तीच्या कामाचे आराखडे व अंदाजपत्रक २५ मार्चपर्यंत सादर करावे. या कामासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन प्राधान्याने टंचाईसदृश गावे घेण्यात यावी, असेही यावेळी जिल्हाधिकारी भिमनवार यांनी सांगितले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी