वनविभागाची वन्यप्राणी संरक्षणार्थ रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 22:21 IST2017-08-12T22:20:53+5:302017-08-12T22:21:31+5:30
स्थानिक जामठा शिवारातील झुडपी जंगल सर्व्हे क्र. ८७ ला लागून असलेल्या एका शेतात जिवंत विद्युत वाहिणीचा धक्का लागून

वनविभागाची वन्यप्राणी संरक्षणार्थ रंगीत तालीम
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक जामठा शिवारातील झुडपी जंगल सर्व्हे क्र. ८७ ला लागून असलेल्या एका शेतात जिवंत विद्युत वाहिणीचा धक्का लागून एक अस्वल मृतावस्तेत पडल्याचे भासऊन वनविभाग व पोलीस विभागाने संयुक्त कार्यवाहिची रंगीत तालीम केली. सदर मॉक ड्रिल मध्ये वनविभाग, पोलीस प्रशासन, महावितरण व पशुवैद्यकीय विभागाने तत्परता दाखवत कार्यवाही पूर्ण केली व प्रशासनाच्या विविध विभागामध्ये योग्य समन्वय असल्याचा अनुभव ग्रामस्थांना आला. यावेळी शेतकºयांना मार्गदर्शनही करण्यात आले.
शेतकरी पीक संरक्षणार्थ विद्युत प्रवाह त्यांच्या शेताच्या सभोवताल लावतात. मात्र सदर जिवंत विद्युत प्रवाहामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडु नये, असा संदेश सदर प्रत्यक्षिकामार्फत देण्यात आला. वन्यप्राणी संरक्षणार्थ निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तात्काळ इतर शासकीय विभागांशी समन्वय साधणे व परिस्थितीवर सकारात्मक नियंत्रण मिळविणे तसेच कार्यवाहित एकसुत्रता आणण्यासाठी रंगीत तालीमचे आयोजन करण्यात येत असल्याचे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोटे यांनी नोंदविले.
सदर रंगीत तालीम पोलीस अधीक्षक निर्मलादेवी व उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक सुहास बढेकर यांच्या हजेरीत पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे, शहर ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत मदने, सावंगीचे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी आपल्या चमूसह मॉक ड्रिलमध्ये सहभाग नोंदविला. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिवाळे व महावितरणाचे अधिकारी संदीप लोहे आणि वनविभागाचे सागर बनसोड, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या सह सर्व कोटेवार, इंगळे, शेख, विजय कांबळे, पोहकर, जाधव, सिरसाट, अभिषेक मुके, पंकज भाखरे यांनी सहभाग नोंदविला.