ढगाळ वातावरणाने हरभरा, तुरीवर संकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 23:43 IST2019-12-02T23:42:38+5:302019-12-02T23:43:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सध्या तुरीचे पीक बहरले असून, हरभराही चांगल्या स्थितीत आहे. मात्र, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण ...

ढगाळ वातावरणाने हरभरा, तुरीवर संकट!
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सध्या तुरीचे पीक बहरले असून, हरभराही चांगल्या स्थितीत आहे. मात्र, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने या पिकांवर रोग पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
ढगाळ वातावरणाने तूर व हरभरा पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. तसेच फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढणार असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. खरिपातील संकटातून सावरत नाही तोच नवे संकट शेतकºयापुढे उभे ठाकले आहे.
सद्यस्थितीत पाने कुरतडणाºया अळीचा तूर पिकावर प्रादुर्भाव झाला असून, धुक्यामुळे फुलांची गळती होत असल्याने शेतकरी चिंतित आहेत. दोन दिवसांआड वातावरणात बदल होत असल्याने तुरीचे पीक संकटात आले आहे. ढगाळ वातावरण व धुक्यामुळे फुल गळती, पाने कुरतडणारे कीटक वाढले आहेत. तसेच अचानक हवामान बदलून ढगाळ वातावरणामुळे सध्या बहरात आलेली तूर हातची जाण्याची शक्यता आहे.
अनेक ठिकाणी फुलांची मोठ्या प्रमाणात गळती होण्यास प्रारंभ झाला आहे. तसेच अळ्यांचा प्रादुर्भाव होण्यासही सुरुवात झाली आहे. सध्या शेतकरी कापूस वेचणीच्या कामात व्यस्त असल्यामुळे तुरीकडे त्याचे लक्ष नसले तरी तुरीची पाहणी करून अळ्यांचा प्रादुर्भाव धोक्याची पातळी ओलांडणारा नाही ना, याची खात्री करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जर अळ्यांची पातळी धोकादायक असेल, तर कृषी विभागाच्यावतीने यासाठी फवारण्या करण्याचा सल्ला शेतकºयांना देण्यात येत आहे.
या करा उपाययोजना
सध्या तुरीचे पीक फुल व कळी येण्याच्या अवस्थेत आहे. येणाºया काळात शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी क्लोरोपायरिफॉस १५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ५0 टक्के फुले व शेंगा असताना क्विनॉलफॉस २0 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दाणे भरताना शेंगा पोखरणाºया अळीसोबत शेंगमाशीचा प्रादुर्भाव वाढल्यास इमामेक्टिन बॅझायेट चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेतकºयांनी वातावरणातील बदल लक्षात घेता योग्य त्या उपाययोजना कराव्या, तसेच कृषी विभागाच्या अधिकाºयांचा सल्ला घेऊन फवारणी करावी. आगामी काळात अळ्यांचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामुळे आतापासूनच दक्षता घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.