दर रविवारी दोन तास स्वच्छतेचा मानस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST2020-03-05T05:00:00+5:302020-03-05T05:00:25+5:30
शिववैभव सभागृहाच्या मागे असलेल्या हनुमान मंदिर आणि सभोवताल असलेल्या डेरेदार वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी स्व.भाऊसाहेब देशमुख, स्व.विलास मिसाळ, स्व.देवराव जोत, स्व. निंबलवारजी यांनी मेहनत घेतली. त्यांचे साक्षीदार असलेले भानुदास इंगोले, बबन हुकूम यांनी घेतलेला पुढाकार आज मोठ्या व हिरव्यागार वृक्षांमध्ये दिसून येतो.

दर रविवारी दोन तास स्वच्छतेचा मानस
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील मानसमंदिर परिसरात नागरिकांकडून स्वच्छता करीत साफसफाई केली जात आहे. दररोज दोन तास परिसराची स्वच्छता करण्याचा मानस असून या उपक्रमात आबालवृद्धांसह बालगोपालही स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत.
शिववैभव सभागृहाच्या मागे असलेल्या हनुमान मंदिर आणि सभोवताल असलेल्या डेरेदार वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी स्व.भाऊसाहेब देशमुख, स्व.विलास मिसाळ, स्व.देवराव जोत, स्व. निंबलवारजी यांनी मेहनत घेतली. त्यांचे साक्षीदार असलेले भानुदास इंगोले, बबन हुकूम यांनी घेतलेला पुढाकार आज मोठ्या व हिरव्यागार वृक्षांमध्ये दिसून येतो. हाच वारसा पुढे नेत परिसरातील महिला व तरुणाई मागील अनेक दिवसांपासून घरासमोरील परिसर स्वच्छ करतात. अनेक जण पहाटे उठून परिसरात साफसफाई करतात. सुरक्षा भिंतीच्या आतमध्ये कॅरीज तयार करून त्यात रोपटी लावण्यात आली आहे. यावेळी नगरसेविका गुंजन मिसाळ यांच्यासह इंद्रायणी खेडकर, दीपाली निंबलवार, श्रद्धा निंबलवार, प्रशांत इंगळे, सतीश मिसाळ, सुहास चानघोडे, राजू वानखेडे, नितीन निंबलवार, सचिन निंबलवार, रवी हुकूम, संजय कोंबे यांनी सहभाग घेतला. स्वच्छतेत सहभागी होत आपल्या घरासमोर कचरा, शिळे अन्न न टाकण्याचे आवाहन गुंजन मिसाळ यांनी केले.