शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

शहराचा पाणीपुरवठा होणार प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 9:35 PM

शहराला शुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या पवनार येथील जलशुद्धीकरणाच्या दुरूस्तीचे काम स्थानिक न.प. प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे २१ जुलै ते ५ आॅगस्ट या कालावधीत शहरातील नागरिकांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे.

ठळक मुद्देतीन दिवसाआड येणार नळाला पाणी : १६ दिवस चालणार युद्धपातळीवर दुरूस्तीचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराला शुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या पवनार येथील जलशुद्धीकरणाच्या दुरूस्तीचे काम स्थानिक न.प. प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे २१ जुलै ते ५ आॅगस्ट या कालावधीत शहरातील नागरिकांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. सतत १६ दिवस चालणाऱ्या या दुरूस्तीच्या कामादरम्यान विविध कामे पूर्णत्वास नेली जाणार असून तब्बल १४ हजार नागरिकांवर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे या दिवसात नागरिकांना पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा लागणार आहे.धाम नदीच्या येळाकेळ व पवनार येथून उचल केलेले पाणी पवनार व वर्धा शहरातील आयटीआय टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. त्यानंतर ते पाणी शहरातील विविध भागात असलेल्या पाच मोठ्या जलकुंभात साठवून त्या पाण्याचा पुरवठा शहरातील सुमारे १४ हजार कुटुंबियांना वर्धा न. प. चा पाणी पुरवठा विभाग करतो. पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम १९६८ मध्ये हाती घेवून ते १९७१ मध्ये पूर्ण करण्यात आले. तेव्हापासून या जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून वर्धेकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा केल्या जात आहे. सुमारे ५० वर्ष जुन्या या जलशुद्धीकरण केंद्रातील विविध साहित्य जीर्ण झाले आहेत. त्यामुळे वेळोवेळी तांत्रिक बिघाडही निर्माण होत होता. सदर तांत्रिक बिघाडीमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होऊन त्याचा त्रास वर्धेकरांना सहन करावा लागत होता. वर्धेकरांचा त्रास लक्षात घेवून सध्या स्थानिक नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रातील दुरूस्तीचे काम होती घेतले आहे. या दुरूस्तीच्या कामाला २१ जुलैपासून सुरूवात होणार असून १६ दिवसांच्या कालावधीत सुमारे २ कोटी रुपये किंमतीचे कामे पूर्णत्त्वास नेली जाणार आहे.दररोज होतेय ३५ द.ल.घ.मी. पाण्याची उचलपवनार व येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्रातून दररोज ३५ द.ल.घ.मी. पाण्याची उचल केली जाते. त्यानंतर पवनार व वर्धा शहरातील आयटीआय टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केलेले २७ द.ल.घ.मी. पाणी शहरातील विविध भागात असलेल्या पाच जलकुंभात साठवून त्याचा पुरवठा शहरातील १४ हजार कुटुंबियांना केल्या जातो. पवनार येथून १२ द.ल.घ.मी. तर आयटीआय टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्रातून १५ द.ल.घ.मी. शुद्ध पाण्याची उचल होते.तिसऱ्या दिवशी होणार टेस्टींगजलशुद्धीकरण केंद्रातील दुरूस्तीचे काम अवघ्या १६ दिवसांच्या कालावधीत पूर्णत्त्वास नेताना या कामाचा कालावधी कुठल्याही परिस्थितीत वाढणार नाही याची दक्षता न.प.चा पाणी पुरवठा विभाग घेत आहे. दुरूस्तीच्या कामादरम्यान होणाऱ्या तांत्रिक कामांची टेस्टींग दोन ते तीन दिवसातच केली जाणार आहे.३० वर्षांची चिंता मिटणारशनिवार २१ जुलै ते रविवार ५ आॅगस्ट या कालावधीत पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रातील दुरूस्तीची विविध कामे पूर्ण केली जाणार आहे. अवघ्या १६ दिवसांत होणाऱ्या कामांमुळे वर्धेकरांची पुढील ३० वर्षांची चिंता मिटणार आहे.ट्रान्सफॉर्मर, टाईल्स, शुद्ध व रॉ वॉटर पंपींग मशीन लागणार नव्यापवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रातील दुरूस्तीच्या कामादरम्यान जलशुद्धीकरण इमारती खालील संपची दुरूस्ती करण्यात येणार आहे. तर शुद्ध पाणी चेंबरच्या टाईल्स, एक जुना ट्रान्सफॉर्मर काढून तेथे दोन नवीन ट्रान्सफार्मर, तीन शुद्ध वॉटर पंपींग मशीन, दोन रॉ वॉटर पंपींग मशीन, इलेक्ट्रीक पॅनल आदी नवीन साहित्य बसविण्यात येणार आहेत. एकूणच १६ दिवसांच्या कालावधीत सुमारे २ कोटी रुपये किंमतीची कामे केली जाणार आहे.एकाच ठिकाणी राहून ठेवता येणार नियंत्रणवर्धा शहरातील नागरिकांना होणाºया पाणी पुरवठा तांत्रिक यंत्रणेवर एकाच ठिकाणी बसून यापूढे नियंत्रण ठेवता येणार आहे. त्यासाठी पवनार येथे व शहरातील आयटीआय टेकडीवर कंट्रोल युनिट तयार करण्यात येणार आहे. शिवाय छाटा कंट्रोल युनिट येळाकेळी येथे तयार करण्यात येणार आहे. याच कंट्रोल युनिट मध्ये बसून एकाच कर्मचाऱ्याला पाणी पुरवठ्याच्या तांत्रिक यंत्रणेवर नियंत्रण ठेवता येणार आहे. विशेष करून न.प.चा एक मोठा अधिकारी थेट मोबाईलवरूनही ही सिस्टीम आॅपरेट करू शकणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Waterपाणी