ग्रामविकास अधिकाऱ्याच्या अनियमिततेमुळे नागरिक त्रस्त
By Admin | Updated: August 5, 2014 23:51 IST2014-08-05T23:51:11+5:302014-08-05T23:51:11+5:30
येथील ग्रामविकास अधिकारी गावात आठवड्यातून दोनच दिवस हजेरी लावतो. यामुळे ग्रामस्थांची संबंधित कामे खोळंबली आहे. यामुळे नंदोरी गावाचा विकासही रखडला आहे. याबाबत नागरिकांनी

ग्रामविकास अधिकाऱ्याच्या अनियमिततेमुळे नागरिक त्रस्त
नंदोरी : येथील ग्रामविकास अधिकारी गावात आठवड्यातून दोनच दिवस हजेरी लावतो. यामुळे ग्रामस्थांची संबंधित कामे खोळंबली आहे. यामुळे नंदोरी गावाचा विकासही रखडला आहे. याबाबत नागरिकांनी गटविकास अधिकारी समुद्रपूर यांच्याकडे तक्रार दिली असून याबाबत योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
समुद्रपूर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या नंदोरी येथे ग्रामविकास अधिकारी पद देण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांना कामानिमित्त गावात यावे लागते. मात्र अधिकारी तेथे मिळत नसल्याने त्यांना वारंवार हेलपाटा माराव्या लागतात. यामध्ये आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून वेळही वाया जात आहे. नागरिकांना शालेय प्रवेश आणि अन्य कामाकरिता दाखल्याची आवश्यकता भासत असते. ग्रामविकास अधिकारी नियमित येत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामविकास अधिकाऱ्याविना शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यात लाभार्थ्यांना अडसर येत आहे. इंदिरा आवास योजना या योजनेतील कामे खोळंबली आहे. यामुळे नागरिकांत रोष व्यक्त होत आहे. कार्यालयात हेलपाटा मारूनही अधिकारी मिळत नसल्याने नागरिकांची पंचाईत होत आहे. निश्चित वेळापत्रक देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
गटविकास अधिकारी यांनी या समस्येकडे लक्ष देवून याची चौकशी करावी. समस्या सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.(वार्ताहर)