शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

चिमुकल्यांच्या डोळ्यादेखत उजाडले छप्पर

By admin | Published: January 17, 2017 1:06 AM

पोटाची खळगी भरण्यासाठी कुणी रस्त्याच्या कडेला हातगाड्या लावतात. कुणी एखाद्या भिंतीलगतची रिकामी जागा पाहुन छोटीसी राहुटी करतात.

अतिक्रमणाचा मारा : बेघर, गरीबांना निवाऱ्यासाठीही मिळेना जागावर्धा : पोटाची खळगी भरण्यासाठी कुणी रस्त्याच्या कडेला हातगाड्या लावतात. कुणी एखाद्या भिंतीलगतची रिकामी जागा पाहुन छोटीसी राहुटी करतात. शहरभर हिंडून एखाद्या वस्तूची विक्री केल्यावरच त्यांच्या जेवणाची व्यवस्था होते. रस्त्याच्या कडेला हातगाड्या आणि अशा राहुट्यांचे वाढलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी होते. यात त्रेधातिरपीट उडते ती याच गोरगरीबांची. गत कित्येक दशकांपासून हा प्रकार होत आहे. आजच्या अतिक्रमणा हटविण्याच्या माऱ्यातही दोन चिमुरड्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या डोईवर असलेले छप्पर हरविले. काही कळत नसले तरी त्या चिमुकल्यांचे निरागस डोळे व बालमन आपल्या आई-वडिलांच्या कृतीचा वेध घेत होते. काहीतरी गमावल्याचा भाव त्यांच्या डोळ्यात साचलेला पाहायला मिळाला. घर गेल्याने ऐन थंडीच्या कडाक्यात त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. सध्या शहरीकरणाने वेग घेतला आहे. शहरांकडे बेरोजगारांचे लोंढे वाढत आहे. या शहरीकरणामुळे अतिक्रमणामध्ये वेगाने वाढ होत आहे. शहरांतील रस्ते अतिक्रमणामुळे निमूळते होत आहे तर खुली मैदाने, वस्त्यांमधील रिकाम्या जागांवर झोपड्या व अवैध दुकाने उभी राहत आहेत. या सर्व प्रकारांमुळे गजबज वाढत आहे. पैसा खर्च करून शहरात वास्तव्य करणाऱ्या शिक्षित, सुजाण नागरिकांना मात्र ही बाब रूजत नाही. व्यवसाय करीत असेल तर त्यांनी अधिकृत जागेची खरेदी करून तो करावा, अशी भूमिका घेतली जाते. यातूनच कधी नागरिकांच्या रेट्याने तर कधी प्रशासनाच्या पुढाकाराने शहरांतील अतिक्रमण हटविले जाते; पण यात कुठेही धनदांडग्यांचा बळी जात नसल्याचे वास्तव आहे. गत दोन दिवसांपासून वर्धा शहरातील अतिक्रमण हटविण्यात येत आहे. यात अवैधरित्या भर रस्त्यात अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांची दुकाने हटविली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बगिचाजवळही शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात काही दुकाने, पानठेल्याचे पक्के अतिक्रमण तोडले. सोबतच त्याच रांगेत भिंतीलगत असलेली काही जुनाट साहित्यापासून बनलेल्या झोपड्याही धराशाई झाल्या. या झोपड्यांवर गजराज चालला नाही; पण कर्मचाऱ्यांच्या तंबीमुळे सदर नागरिकांनीच आपल्या झोपड्या एकेक बासा, टीन काढत गोळा केल्या. यात घरातील भांडे व अन्य साहित्य उघड्यावर आले होते. हे सर्व दृश्य दोन निरागस चिमुरडे पाहत होते. त्यांना काहीही कळत नसले तरी त्यांच्या डोळ्यादेखत ते बेघर होत होते. मन हेवालणारा हा प्रकार प्रत्येक अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये घडतो; पण या बेघरांच्या भावना जाणून घेण्यात कुणालाही रस नसतो. पण रात्रीचे काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर होताच! यांचा विचार कुणी करावा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या नागरिकांप्रती कुणाचे काही कर्तव्य नाही काय, असा प्रश्नही आपसूकच उपस्थित झाल्यावाचून राहत नाही.(कार्यालय प्रतिनिधी)