बाल साहित्य संमेलन बा-बापूनगरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 06:00 AM2019-12-12T06:00:00+5:302019-12-12T06:00:15+5:30

विद्यार्थ्यांच्या संगीत व नृत्य सादरीकरणाने या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. यावेळी बालकांसाठी लेखन, वाचन व सांस्कृतिक उपक्रम राबविणाऱ्या डॉ. सुनीता कावळे, हरीश इथापे, सचिन सावरकर, मोहित सहारे यांचा सत्कारही करण्यात येईल. उद्घाटनानंतर दुपारी १२.३० वाजता चिन्मय मांडलेकर यांची प्रकट मुलाखत सना पंडित यांच्यासह खुशी गोमासे व आयुषी ठाकरे या विद्यार्थिनी घेणार आहेत.

Children's Literature Meeting Prepared By Baba Bapunagari | बाल साहित्य संमेलन बा-बापूनगरी सज्ज

बाल साहित्य संमेलन बा-बापूनगरी सज्ज

googlenewsNext
ठळक मुद्देविदर्भ साहित्य संघ व स्कूल ऑफ स्कॉलर्सचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीवर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघ शाखा आणि स्कूल आॅफ स्कॉलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या बाल साहित्य संमेलनाची सुरुवात गुरुवार १२ रोजी होते आहे. सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित या बाल साहित्य संमेलनासाठी बा-बापूनगरी सज्ज झाली आहे.
गुरुवारी उद्घाटनापूर्वी सकाळी ९ वाजता लोक विद्यालयातून ग्रंथदिंडी निघणार असून पालखीत भारताचे संविधान आणि सत्याचे प्रयोग हे ग्रंथ राहणार आहेत. विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग असणाऱ्या या दिंडीची सांगता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पणाने होईल. संमेलनाचे उद्घाटन सावंगी येथे सकाळी ११ वाजता चिन्मय मांडलेकर यांच्या हस्ते होईल. यावेळी, संमेलनाध्यक्ष चंद्रकांत चन्ने, प्रमुख अतिथी माजी खासदार दत्ता मेघे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, मेघे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले, स्वागताध्यक्ष आभा मेघे, संमेलन संयोजक संजय इंगळे तिगावकर, निमंत्रक शुभदा फडणवीस, केद्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस विलास मानेकर, शाखा समन्वय सचिव प्रदीप दाते तसेच आयोजन व स्वागत समितीचे सदस्य उपस्थित राहतील.
विद्यार्थ्यांच्या संगीत व नृत्य सादरीकरणाने या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. यावेळी बालकांसाठी लेखन, वाचन व सांस्कृतिक उपक्रम राबविणाऱ्या डॉ. सुनीता कावळे, हरीश इथापे, सचिन सावरकर, मोहित सहारे यांचा सत्कारही करण्यात येईल. उद्घाटनानंतर दुपारी १२.३० वाजता चिन्मय मांडलेकर यांची प्रकट मुलाखत सना पंडित यांच्यासह खुशी गोमासे व आयुषी ठाकरे या विद्यार्थिनी घेणार आहेत. दुपारी २ वाजता प्रेमानंद गज्वी लिखित व नितप्रिया प्रलय दिग्दर्शित ‘हे राम’ ही महात्मा गांधी यांच्या जीवनावरील एकांकिका स्कूल आॅफ स्कॉलर्सचे विद्यार्थी सादर करतील.
शुक्रवारला महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर आधारित कथाकवितांचे सादरीकरण होईल. यात सकाळी १० वाजता शालेय विद्यार्थ्यांचे कविसंमेलन तर ११.३० वाजता ‘बापूंच्या गोड गोष्टी’ हा कथावाचनाचा कार्यक्रम होईल. दुपारी २ वाजता अभिरूप न्यायालय आयोजित असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक आपली बाजू मांडणार आहेत.
या कार्यक्रमात न्यायधीशाच्या भूमिकेतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीती देव न्यायनिवाडा करतील. संमेलनाचा समारोप व खुले अधिवेशन दुपारी ३.३० वाजता होणार असून संमेलनाध्यक्ष चंद्रकांत चन्ने, प्रमुख अतिथी दत्ता मेघे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, बालसाहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त सलीम सरदार मुल्ला, बाल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभदा खिरवडकर यांची उपस्थिती राहणार आहे. संमेलनस्थळाला बा-बापू साहित्यनगरी असे नाव देण्यात आले असून या परिसरातील ग्रंथदालनात बालकुमार साहित्य, गांधीसाहित्य, विज्ञानखेळणी, छायाचित्रप्रदर्शनी, चित्रकला व हस्तकला, खाद्यपदार्थ आदींचे वैविध्यपूर्ण दालने राहणार आहेत. त्यामुळे बालकांसह पालकांनी या संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संमेलनाध्यक्ष चन्ने, उद्घाटक मांडलेकर
सावंगी येथील बा-बापू साहित्य नगरीत आयोजित विदर्भस्तरीय सहाव्या बाल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बसोली ग्रुपचे संचालक, ख्यातनाम चित्रकार चंद्रकांत चन्ने राहणार असून प्रसिद्ध सिनेनाट्यकलावंत चिन्मय मांडलेकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. दोन दिवसीय या संमेलनामध्ये बालकांचे तारांगणच या साहित्यनगरीत अवतरणार आहेत.

Web Title: Children's Literature Meeting Prepared By Baba Bapunagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.