निमगव्हाण येथे आईसह मुलाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST2020-03-21T06:00:00+5:302020-03-21T06:00:09+5:30
सुरेंद्र राऊत हा मागील अनेक दिवसांपासून वाळू तस्कर आणि माफियांविरोधात तक्रारी करायचा. शिवाय तो माहिती अधिकाराचा वापर करून अधिकची माहितीही जाणून घेत असे. त्यामुळे त्याचे गावातीलच काहीशी वाद होते. सुरेंद्र राऊत व त्याची आई जनाबाई हे दोघे दुचाकीने शेतातून जात असताना अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला.

निमगव्हाण येथे आईसह मुलाची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जुन्या वादाचा वचपा काढत अज्ञातांनी आईसह मुलाची हत्या करण्यात आल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाºया निमगव्हाण येथे गुरूवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पुलगाव पोलीस ठाण्यात मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनाबाई नीळकंठ राऊत (६५) व सुरेंद्र नीळकंठ राऊत (३०) अशी मृतांची नावे आहेत.
सुरेंद्र राऊत हा मागील अनेक दिवसांपासून वाळू तस्कर आणि माफियांविरोधात तक्रारी करायचा. शिवाय तो माहिती अधिकाराचा वापर करून अधिकची माहितीही जाणून घेत असे. त्यामुळे त्याचे गावातीलच काहीशी वाद होते. सुरेंद्र राऊत व त्याची आई जनाबाई हे दोघे दुचाकीने शेतातून जात असताना अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. मारेकरांनी सुरेंद्र आणि जनाबाई या दोघांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जीवानिशी ठार केले. सदर बाब लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांच्यासह पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पुलगावच्या शासकीय रुग्णालयात पाठविले. पुढील तपास सुरू आहे.
मृतांच्या डोक्यावर गंभीर जखमा
सुरेंद्र व जनाबाई यांच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी स्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपींना यवतमाळ येथून अटक करण्यात आली आहे.