शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी देवळीकरांना दिलेला शब्द पाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:46 IST

निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवळीकरांना पंतप्रधान आवास योजनेबाबत दिलेला शब्द पाळला आहे. राज्यात पहिल्यांदा ‘क’ स्तरीय नगर परिषदांमध्ये देवळीला हा मान मिळाला आहे. ८२० घरांची मंजूरी प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देरणजीत पाटील : पंतप्रधान आवासच्या घरकुल मॉडेलचा श्रीगणेशा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवळीकरांना पंतप्रधान आवास योजनेबाबत दिलेला शब्द पाळला आहे. राज्यात पहिल्यांदा ‘क’ स्तरीय नगर परिषदांमध्ये देवळीला हा मान मिळाला आहे. ८२० घरांची मंजूरी प्राप्त झाली आहे. नागरिकांच्या माहितीसाठी अडीच लाखांच्या खर्चातून बांधलेल्या घरकुलाच्या मॉडेलचे लोकार्पण करताना आनंद होत असल्याचे प्रतिपादन नगर विकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी केले.स्थानिक न.प.च्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, माजी खासदार सुरेश वाघमारे आदींची उपस्थिती होती. माजी पंतप्रधान तथा भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देवळी न.पं.च्या सभागृहाला देवून येथील पालिका पदाधिकाऱ्यांनी या महामानवाच्या स्मृती जोपासल्या आहेत. त्यांचे हे कार्य भारतातील इतर नागरिकांना प्रेरणा देणारे ठरले असेही याप्रसंगी ना. पाटील यांनी सांगितले. .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकुलाबाबत देवळी न.प.ला संपूर्ण राज्यात पहिली पसंती दिली. याबद्दल मी त्यांचा आभारी आहो. या योजनेच्या माध्यमातून गरीबांचे पक्क्या घराबाबतचे स्वप्न पूर्णत्वास जाणार आहे, असे यावेळी मनोगत व्यक्त करताना खा. रामदास तडस यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान ना. पाटील यांच्या हस्ते ५० लाखांच्या खर्चातून पूर्णत्वास जाणाºया हरित पट्टे योजनेचा शुभारंभ वृक्षारोपण करून करण्यात आला. शिवाय न.प. सभागृहाचे ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी’ असे नामकरण आणि घरकुलाच्या मॉडेलचे लोकार्पण करण्यात आले. मागील वर्षी देवळी न.प.ला हागणदारीमुक्त बाबत प्राप्त झालेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण पुरस्काराच्या उर्वरीत ७० लाखांच्या धनादेशाचे प्रमाणपत्र ना. पाटील यांच्या हस्ते न. प. पदाधिकाºयांना देण्यात आले. शासनाकडून घरकुलाचे पैसे येण्याची वाट न पाहता बांधकामाला स्वत:च्या खर्चातून सुरूवात केल्याबद्दल जगदीश गोबाडे, देवका तराळे, अविनाश उगेमुगे व साधना खेरूडे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रास्ताविक नगराध्यक्ष सुचिता मडावी यांनी केले तर आभार न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर यांनी मानले. कार्यक्रमाला न.प. मुख्याधिकारी अंकुश जाधव, न.प. गटनेता शोभा तडस, सभापती कल्पना ढोक, सारीका लाकडे, सुनीता बकाणे, सुनीता ताडाम, पं.स. सभापती विद्या भुजाडे, जयंत येरावार, नगरसेवक नंदू वैद्य, संध्या कारोटकर, संगीता तराळे, मारोती मरघाडे, मिलिंद ठाकरे, राहुल चोपडा, जि. प. सदस्य मयुरी मसराम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस