‘त्या’ केंद्राबाहेर पसरली स्मशान शांतता
By Admin | Updated: March 15, 2015 02:00 IST2015-03-15T02:00:23+5:302015-03-15T02:00:23+5:30
स्थानिक दीपचंद विद्यालय व यशवंत विद्यालय या परीक्षा केंद्रावर ‘व्हॉट्स अॅप’द्वारे पेपर फुटीचे वृत्त झळकताच शनिवारी दोन्ही परीक्षा केंद्रावर शांतता पाहावयास मिळाली.

‘त्या’ केंद्राबाहेर पसरली स्मशान शांतता
सेलू : स्थानिक दीपचंद विद्यालय व यशवंत विद्यालय या परीक्षा केंद्रावर ‘व्हॉट्स अॅप’द्वारे पेपर फुटीचे वृत्त झळकताच शनिवारी दोन्ही परीक्षा केंद्रावर शांतता पाहावयास मिळाली. दीपचंद विद्यालयाची आसन व्यवस्था तळमजल्यावरून वरच्या मजल्यावर नेऊन ठेवण्यात आली. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही तर यशवंत विद्यालयात कॉपी पुरविणाऱ्या पालकांचाही भ्रमनिरास झाला. शनिवारी परीक्षा केंद्राबाहेर सर्वत्र स्मशान शांतता पसरलेली होती़
दीपचंद विद्यालय या परीक्षा केंद्रावर पेपर फुटीचे प्रकार तर यशवंत विद्यालय परीक्षा केंद्रावर कॉप्या पुरविल्या जात होत्या़ याबाबत वृत्त उमटताच दोन्ही केंद्रांवर खबरदारी घेण्यात आली़ यशवंत विद्यालयात एक माता आपल्या मुलीला कॉपी देण्यासाठी स्वत:च्या नोकरीला दांडी मारून परीक्षा काळात इकडे-तिकडे भटकत होती; पण आज सर्वांचेच प्रयत्न व्यर्थ गेले़ पेपर सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी बाहेर गोंधळ असल्यामुळे पेपर चांगला गेल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली. दररोज जर अशाच पद्धतीने परीक्षा झाली तर खरचं विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांनाही त्रास होणार नाही; पण कॉपी बहाद्दरांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसत होते़(तालुका प्रतिनिधी)