शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रशेखरच्या उपोषणाने राजकीय गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2016 02:11 IST

नगर पालिकेच्या गलथान कारभारामुळे शहरात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत

चौथ्या दिवशीही पालिकेकडून दुर्लक्ष : आजी-माजी आमदारासह राजकीय नेते दाखल सिंदी (रेल्वे) : नगर पालिकेच्या गलथान कारभारामुळे शहरात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत येथील चंद्रशेखर बेलखोडे याने आपल्या जनवारांसह उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला रविवारी चार दिवस झाले तरी पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्षच आहे. असे असले तरी शहरात राजकीय नेत्यांची गर्दी होत आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी कुठलाही तोडगा निघाला नसल्याने कॉँग्रेसचे गटनेता तथा नगरसेवक आशिष देवतळे, नगरसेवक सुनील बोंबले, भाजपाचे गटनेता तथा नगरसेवक प्रविण सिर्सीकर, नगरसेविका पुष्पा सोनटक्के, जिजा तळवेकर यांनी उपोषणाच्या पेंडालमध्ये बसून एकदिवसीय लाक्षणीय उपोषण केले. त्याचप्रमाणे उपोषणाचा तोडगा काढण्यासाठी आठ नगरसेवकांनी स्वाक्षऱ्या करून नगर पालिकेची विशेष सभा तातडीने आयोजित करण्याबाबतचे लिखीत निवेदन नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना दिले. त्या अनुषंगाने नगराध्यक्ष यांनी सोमवारी दुपारी १ वाजता न.प. कार्यालय पालिकेची विशेष सभा बोलविली आहे. या सभेमध्ये काय निर्णय होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान रविवारी आ. समीर कुणावार यांनी चंद्रशेखरच्या उपोषणाची माहिती घेण्याकरिता उपोषण मंडपात येत त्याच्याशी चर्चा केली. शिवाय त्याला ५० हजार रुपयांची मदतीही दिली. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याचे आश्वासन दिले. माजी आमदार अशोक शिंदे यांनी उपोषण मंडपात येत उपोषणकर्त्याची विचारणा केली. या प्रकरणावर तोडगा काढण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दुरध्वनीवर दिले. मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी उपोषणाला पाठिंबा देत सोमवारपर्यंत तोडगा न निघाल्यास मनसेच्यावतीले आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.(प्रतिनिधी) साऱ्यांचा निवडणुकीवर डोळा येत्या डिसेंबर महिन्यात येथील पालिकेच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकीवर डोळा ठेवून राजकीय वातावरण उपोषणाच्या निमित्ताने चांगलेच तापले असल्याची चर्चा शहरात आहे. रविवारी तीनही पक्षाच्या नेत्यांच्या आगमनाने व त्यांच्या उपोषणकर्त्यांच्या विचारणेवरून याचा प्रत्यय शहरातील नागरिकांना आला.