शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामे आकर्षणाचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST

सेवाग्राम येथील अण्णासागर तलाव येथे महात्मा गांधी व विनोबा भावे यांचे भव्य स्वरुपातील स्क्रॅप स्कल्पचर उभारण्यात येणार आहे. हे शिल्पे ही धातूच्या टाकाऊ वस्तुपासून तयार करण्यात येणार असून त्यांची उंची साधारणपणे ३५ ते ४० फुट असणार आहे.

ठळक मुद्देअशोक लटारे : सेवाग्राम परिसरातील विविध कामांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहे. बहूतांश कामे पुर्णत्वास गेली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत होणारी विकासकामे ही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे, असा विश्वास प्रभारी जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी व्यक्त केला.सेवाग्राम येथील अण्णासागर तलाव येथे महात्मा गांधी व विनोबा भावे यांचे भव्य स्वरुपातील स्क्रॅप स्कल्पचर उभारण्यात येणार आहे. हे शिल्पे ही धातूच्या टाकाऊ वस्तुपासून तयार करण्यात येणार असून त्यांची उंची साधारणपणे ३५ ते ४० फुट असणार आहे. हे स्क्रॅप स्कल्पचर तयार करण्यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे तीन प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली २५ विद्यार्थी व पाच तंत्र सहाय्यक शिल्प साकारण्याची कामे दिवस रात्र करीत आहे. या कामाची जिल्हाधिकारी अशोक लटारे व अन्य मान्यवरांनी पाहणी करुन समाधान व्यक्त केले.सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत शहरात सुरु असलेली विविध कामाची पाहणी करतांना जिल्हाधिकारी यांच्या समवेत महाराष्ट्र शासनाचे कला संचालक राजीव मिश्रा, जे.जे. स्कूल आॅफ आर्ट मुबंईचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे, उपकला संचालक विनोद दांडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, उपविभागीय अभियंता संजय मंत्री, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, मे. अडारकर असोशिएटसचे प्रतिनिधी वसिम खान, जे.जे. स्कूल आर्ट मुबंईचे प्रा. शशिकांत काकडे, प्रा. विजय सपकाळ, प्रा. विजय बोंदरे, प्रा. यशवंत भावसार व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी वर्धा शहरातील गांधी चौक, आंबेडकर चौक, बजाज चौक येथे साकारण्यात आलेली म्युरल, भिंत्तीचित्र व सुरक्षिततेबाबत चर्चा करुन कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. मान्यवरांनी सेवाग्राम येथील चरखागृहास भेट देऊन प्रस्तावित चरखा म्युझियम कामाची पाहणी केली. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत चरख्याचे महत्व अधोरेखित करणारे आणि महात्मा गांधींनी स्वराज्य व स्वावलंबनासाठी वापरलेल्या चरख्याचे महत्व दृकश्राव्य माध्यमातून मांडण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांना मोठी संधी आहेत.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम