शेतकऱ्यांच्या गोंधळानंतर सीसीआयची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:00 IST2020-05-22T05:00:00+5:302020-05-22T05:00:09+5:30
मंगळवारी असाच प्रकार झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ३४ कापूस गाड्या बाजार समितीच्या आवारात घेण्यात आल्या. मात्र, मंगळवारीही या गाड्यांचा लिलाव न झाल्याने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांच्या नेतृत्वात सीसीआयच्या ग्रेडरसोबत चर्चा करण्यात आली. आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर या कापूस गाड्यांचा लिलाव करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या गोंधळानंतर सीसीआयची खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : सीसीआयचे कापूस खरेदीत दररोज शंभर गाड्या घेण्याचे धोरण ठरले आहे. मात्र, काही शेतकरी लिलावानंतर गाड्या आणून दबाव वाढवित असल्याचा आरोप होत आहे.
मंगळवारी असाच प्रकार झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ३४ कापूस गाड्या बाजार समितीच्या आवारात घेण्यात आल्या. मात्र, मंगळवारीही या गाड्यांचा लिलाव न झाल्याने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांच्या नेतृत्वात सीसीआयच्या ग्रेडरसोबत चर्चा करण्यात आली. आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर या कापूस गाड्यांचा लिलाव करण्यात आला.
सीसीआयच्या खरेदीतील अडचणीनुसार बाजार समितीने दररोज शंभर गाड्या घेण्याचे धोरण ठरवून शेतकऱ्यांना त्या दिवसाचे टोकण दिले जात आहे. मात्र, या टोकण पद्धतीत मागचे पुढे करून व्यवहार होत असल्याचा आरोप होत आहे. त्यातच कापूस गाड्यांचा लिलाव झाल्यानंतर सायंकाळदरम्यान काही शेतकरी व व्यापारी केंद्रावर गाड्या आणून झुबंड करीत आहे. यामध्ये कट्टीचा व्यवहार करणाºया कमिशन एजंटचा भरणा जास्त असल्याने दबाव आणला जात आहे.
पावसाळा तोंडावर आला असताना या सर्व घडामोडीत गरजू अजूनही प्रतीक्षेत असून लिलावाचे टोकण मिळण्याची वाट पाहत आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन सीसीआयने दररोज ३०० कापूस गाड्या घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी बकाणे यांनी यावेळी केली.
शेतकऱ्यांच्या कापसासाठी सीसीआयची खरेदी असताना यामध्ये कट्टीचा व्यवहार करणाऱ्या कमिशन एजंटची गर्दी वाढली आहे. अवकाळी पावसाची स्थिती व मजुरांची अडचण लक्षात घेता सीसीआयच्या खरेदीला मर्यादा आहेत. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या टोकणनुसार व्यवहार होत नसेल तर ही पद्धती बंद करण्यात यावी.
- रमेश बोरवले, सीसीआय ग्रेडर, देवळी.