शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कापूस लिलावाच्या प्रक्रियेमध्ये सीसीआय ग्रेडरची दांडी; शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 18:11 IST

Wardha : कापसाची आवकही कमी, भावबाजीतही फटका

लोकमत न्यूज नेटवर्क देवळी : देवळीच्या कापूस लिलाव प्रक्रियेत सीसीआय ग्रेडरचा सहभाग राहत नसल्याने याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांना होत असल्याचा आरोप होत आहे. गुरुवारच्या तारखेपर्यंत देवळीच्या बाजारात ४६ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी झाली असून यामध्ये सीसीआयची खरेदी नाममात्र ९ हजार क्विंटलपर्यंत झाली आहे. 

यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झाले असून भावबाजीचा सुद्धा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत आला आहे. अशावेळी सीसीआयची खरेदी पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने, कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहण्यात येत आहे. देवळी केंद्रावर सीसीआयचे अधिकृत ग्रेडर म्हणून चंद्रकांत हिवसे कार्यरत असून त्यांचेकडे वर्धा, वायगाव, आमला, उमरी व शिरपूर आदी ठिकाणचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे सर्व केंद्रावर ऐकाच वेळी काम करणे शक्य नसल्याने हिवसे यांच्या अनुपस्थितीत कर्मचारी ग्रेडिंग करीत आहे. परंतु या ग्रेडींगदरम्यान अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये हुज्जत होतांना दिसत आहे. देवळीच्या बाजार समितीत रजिस्ट्रेशन केल्यानंतर सीसीआयच्या कापूस खरेदीची तसेच ग्रेडिंगची प्रक्रिया स्थानिक नरसाई जिनिंगमध्ये राबविली जात आहे. सोबतच कापसाचा ओलावा तपासून प्रतिक्विंटल ७ हजार ५२१ पर्यंत भाव दिला जात आहे. सीसीआयच्या तुलनेत आठ दिवसापूर्वी खासगी व्यापाऱ्यांचे भाव सुद्धा प्रतिक्विंटल ७ हजार ३०० ते ७ हजार ४०० पर्यंत होते. परंतु सध्या हे भाव ७ हजार १०० ते ७ हजार २०० पर्यंत खाली आले आहे. सीसीआयचे अधिकारी लिलावाच्या प्रक्रियेत सहभागी होत नसल्याने खासगी व्यापारी याचा फायदा घेत आहे. त्यामुळे कापसाच्या भावबाजीत तेजी राहण्यासाठी, खुल्या लिलावात सीसीआयचे असणे आवश्यक झाले आहे. 

कापसाची उलंगवाडीकडे वाटचाल या हंगामात कापसाचे उत्पादन अतिशय कमी असून, परिसरातील कापसाची शेती उलंगवाडीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कपाशीवर लाल्या रोग आल्याने दोन वेच्यातच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच यवतमाळ, राळेगाव व आजूबाजूच्या परिसरात सीसीआयचा विस्तार वाढल्याने देवळीच्या केंद्रावर बाहेरून येणारी कापसाची आवक घटली आहे. त्यामुळे या केंद्रावरील दरवर्षीचा साडेपाच ते सहा लाख क्विंटल पर्यंतच्या खरेदीचा आकडा खाली येणार असल्याचे बोलले जात आहे

सीसीआयकडून आठ दिवसाच्या फरकाचा मिळतो धनादेश...सीसीआयच्या वतीने आधार लिंक असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आठ दिवसाच्या फरकाने कापसाचे चुकारे वळते केले जात आहे. तर खासगी व्यापारी तीन दिवसांच्या फरकाने कापसाचे धनादेश देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून सीसीआयच्या आसपासच भाव मिळत आहे व चुकारेही सीसीआयपेक्षा लवकर मिळत असल्याने शेतकरीही आपले हित जोपासत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :cottonकापूसwardha-acवर्धाFarmerशेतकरी