भरधाव ट्रेलरची मालवाहूला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:34 IST2017-08-15T00:34:28+5:302017-08-15T00:34:56+5:30
भरधाव ट्रेलरचे ब्रेक अचानक फेल झाल्याने वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

भरधाव ट्रेलरची मालवाहूला धडक
ठळक मुद्देमहाबळा शिवारातील घटना : अचानक ब्रेक झाले फेल
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : भरधाव ट्रेलरचे ब्रेक अचानक फेल झाल्याने वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरु असतानाच ट्रेलर समोरून येणाºया मालवाहूवर धडकला. यात कुठलीही प्राणहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी महाबळा शिवारात घडली.
सविस्तरवृत्त असे की, बुटीबोरी येथून अमरावतीकडे जात असलेल्या सी.जी. ०४ जे.सी. ५२७१ क्रमांकाच्या ट्रेलरने एम.एच. ४८ जे. ०३५८ क्रमांच्या मालवाहूला धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. या घटनेची पोलिसांनी नोंद घेतली आहे.