टायर फुटल्याने मालवाहू उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST2020-05-10T05:00:00+5:302020-05-10T05:00:07+5:30

तिगाव येथील रहिवासी असलेला यशवंत कळमकर हा एम.एच. ३२ ए.जे. १७७९ क्रमांकाच्या मालवाहू मध्ये केमिकस्ल पावडर घेऊन चंद्रपूरच्या दिशेने जात होता. भरधाव मालवाहू बरबडी शिवारात आला असता मालवाहूचा मागील टायर अचानक फुटला. यात यशवंत गंभीर जखमी झाला.

The cargo overturned due to a flat tire | टायर फुटल्याने मालवाहू उलटला

टायर फुटल्याने मालवाहू उलटला

ठळक मुद्देचालक गंभीर। नागपूर-हैदराबाद मार्गावरील बरबडी शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : केमिकल्सचे पावडर घेऊन चंद्रपूरकडे जात असलेल्या मालवाहूचा अचानक टायर फुटला. अशातच वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन उलटले. या अपघातात मालवाहू चालक यशवंत रविंद्र कळमकर (२७) हा गंभीर जखमी झाला. ही घटना नागपूर-हैद्राबाद मार्गावरील बरबडी शिवारात शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
तिगाव येथील रहिवासी असलेला यशवंत कळमकर हा एम.एच. ३२ ए.जे. १७७९ क्रमांकाच्या मालवाहू मध्ये केमिकस्ल पावडर घेऊन चंद्रपूरच्या दिशेने जात होता. भरधाव मालवाहू बरबडी शिवारात आला असता मालवाहूचा मागील टायर अचानक फुटला. यात यशवंत गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, शरद इंगोले, शेखर डोंगरे, ज्योती राऊत यांनी घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णालयाकडे रवाना केले.

दुचाकीची समोरासमोर धडक; बहीण-भाऊ जखमी
अल्लीपूर : भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील बहिण-भाऊ जखमी झाले. हा अपघात भय्यापूर शिवारात झाला. अशोक भगत आणि सखू भगत हे दोघे बहिण-भाऊ एम. एच. ४० के. ३०३९ क्रमांकाच्या दुचाकीने कानगाव येथून मोझरी येथे जात होते. दरम्यान भय्यापूर शिवारात पंकज वाटकर रा. मोझरी याने त्याच्या ताब्यातील दुचाकी निष्काळजीपणे चालवून धडक दिली. यात अशोक आणि सखू हे जखमी झाले.

Web Title: The cargo overturned due to a flat tire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात