लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : वर्धेकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मालवाहू आॅटोला समोरुन येणाºया कारने जबर धडक दिली. यात आॅटो चालक अनिल चलाख रा. वडगाव याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास वर्धा-नागपूर मार्गावरील माहेर मंगल कार्यालयाजवळ झाला. गौरव रामभाऊ धानकुटे रा. सेलू व वासुदेव एलोरे. अशी जखमींची नावे आहेत.प्राप्त माहितीनुसार, शेतातील भाजीपाला घेऊन जाणाºया आॅटोला समोरून येणाºया एम. एच. ३२ वाय. २३५२ क्रमांकाच्या कारने धडक दिली. यात आॅटोचालक अनिल याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना मिळेल त्या वाहनाने सेवाग्राम येथील रुग्णालयाकडे रवाना केले. माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त वाहनं ताब्यात घेत पंचनामा केला. या घटनेची सेलू पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.सूचना फलक लावण्याची मागणीसध्या वर्धा-नागपूर मार्गावर सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. शिवाय आवश्यक ठिकाणी सूचना फलक नसल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो.
मालवाहू-कारच्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:03 IST
वर्धेकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मालवाहू आॅटोला समोरुन येणाºया कारने जबर धडक दिली. यात आॅटो चालक अनिल चलाख रा. वडगाव याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मालवाहू-कारच्या धडकेत एक ठार
ठळक मुद्देदोघे गंभीर : वर्धा-नागपूर मार्गावरील घटना