कारची दुचाकीला धडक; दोघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 23:58 IST2019-08-09T23:57:57+5:302019-08-09T23:58:26+5:30
भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना वायगाव (नि.)-देवळी मार्गावर आजगाव शिवारात गुरूवारी घडली.

कारची दुचाकीला धडक; दोघे गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना वायगाव (नि.)-देवळी मार्गावर आजगाव शिवारात गुरूवारी घडली.
प्राप्त माहितीनुसार, सिरसगांव (ध.) येथील अक्षय अशोक गोडे व मंदा अशोक गोडे हे एम. एच. ३२ ए. बी. ७६८५ क्रमांकाच्या दुचाकीने वायगावच्या दिशेने येत होते. दुचाकी आजगाव शिवारात आली असता एम.एच.४० पी. २७७४ क्रमांकाच्या कारने दुचाकीला जबर धडक दिली. यात अक्षय गोडे व मंदा गोडे या गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले. अपघाताची माहिती मिळताच देवळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद घेऊन आरोपी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा चुराडा झाला. शिवाय कार रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन उलटली.