रानडुकरांचा कळप समोर आल्याने विचित्र अपघात, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 01:01 IST2022-03-13T00:59:00+5:302022-03-13T01:01:09+5:30
तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

रानडुकरांचा कळप समोर आल्याने विचित्र अपघात, दोघांचा मृत्यू
- चैतन्य जोशी
सेलसुरा (वर्धा): अचानक रस्ता ओलांडताना रानडुकरांचा कळप समोर आला. रानडुकराला फॉरचूनर कारने धडक दिल्याने कार पलटी झाली,
तर मागून येणाऱ्या एका कारने सुद्धा रानडुकरापासून वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीला धडक दिली. यात ती पलटी झाली.
तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन रानडुकरे अपघातात ठार झाली आहेत.
- जखमींना सावंगी रुग्णालयात केले दाखल.
- मृतांमध्ये लहान मुलाचा सुद्धा समावेश आहे.
- घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी पियूष जगताप कर्मचाऱ्यांसह दाखल.
याच सेलसुरा येथील परिसरात काही दिवसांपूर्वी झाला होता भीषण अपघात, त्या अपघातात सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांना गमवावा लागला होता.